राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा; म्हणाले…

215

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा 9 फेब्रुवारीला वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांच्यावर राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. शिवसेनेत बंड करुन राज्यात सत्ता स्थापन केल्यानंतर शिंदे यांचा हा पहिला वाढदिवस आहे. त्यामुळे संपूर्ण ठाणे नगरी मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा फलकांनी सजली आहे. उठावानंतरचा शिंदे यांचा हा पहिलाचा वाढदिवस असल्याने ठाकरे गट त्यांना शुभेच्छा देतात का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यातच आता ठाकरे गटाचे नेते , खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

( हेही वाचा: दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी, आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला )

काय म्हणाले राऊत?

व्यक्ती म्हणून, माजी सहकारी म्हणून अनेकांना आपण वाढदिवसाला किंवा त्यांच्या घरातील शुभकार्याला शुभेच्छा देतच असतो. एकनाथ शिंदे आणि आम्ही नक्कीच एकमेकांचे राजकीय शत्रू आहोत. ते शत्रूत्व कायम राहील. त्यांनी शिवसेना फोडून बाळासाहेबांच्या शिवसेनेचे सत्तेच्या माध्यमातून, पैशाच्या माध्यमातून अस्तित्व नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पण ते होणार नाही. त्याविरोधात लढाई सुरु राहील. पण एखाद्या व्यक्तीचा वाढदिवस असेल तर त्याला शुभेच्छा देण्याची प्रथा आहे. त्यामुळे आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत, असे संजय राऊत  म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.