चिन्ह गोठवण्याच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; याचिका दाखल

131

ठाकरे गटाने निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. निवडणूक आयोगाने धनु्ष्यबाण हे चिन्ह गोठवले आहे. या चिन्हावर शिंदे गट आणि ठाकरे गट या दोन्ही गटाकडून दावा करण्यात आल्याने निवडणूक आयोगाकडून चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच, दोन्ही गटांना शिवसेना हे नावही वापरता येणार नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले. याचा सर्वाधिक फटका उद्धव ठाकरे गटाला बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

( हेही वाचा: कट्यार कोणी काळजात घुसवली? तेच रडगाणे, तीच कथा, तोच स्क्रीप्टरायटर… शिंदे गटाचा ठाकरेंवर हल्लाबोल )

न्यायालयात याचिका दाखल

शनिवारी निवडणूक आयोगाकडून धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आले आहे. चिन्ह गोठवण्यात आल्याने आता ठाकरे गट तसेच शिंदे गट यांना धनुष्यबाण हे चिन्ह वापरता येणार नाही. सोबतच शिवसेना हे नाव देखील वापरता येणार नाही. त्यामुळे रविवारी शिंदे गट आणि ठाकरे गट चिन्ह आणि नावासाठी प्रत्येकी तीन पर्याय निवडणूक आयोगाकडे सादर केले आहेत. मात्र निवडणूक आयोगाचा निर्णय येण्यापूर्वीच ठाकरे गटाकडून निडवणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.