बेळगाव दौरा अद्याप रद्द झालेला नाही. या दौ-याबाबत कर्नाटक सरकारला कळवले आहे. तसेच, या दौ-याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील, असे स्पष्टीकरण शंभूराज देसाई यांनी दिले आहे. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
6 तारखेला महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी बेळगावातील मराठी बांधवांनी कार्यक्रम आयोजित केला आहे. त्या कार्यक्रमासाठी आम्ही आमचा दौरा सहा तारखेला निश्चित केलेला आहे. आम्ही येणार आहोत हे कर्नाटक सरकारला कळवले आहे. सविस्तर दौरा कळवलेला नाही. या दौ-याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री चर्चा करुन ते जो आदेश देतील त्यानुसार निर्णय घेऊ, असे शंभूराज देसाई म्हणाले.
( हेही वाचा: मागच्या अडीच वर्षांत जी कामे झाली नाहीत ती 5 महिन्यांत झाली; शिंदे गटाच्या नेत्याचा ठाकरेंना टोला )
….पण आम्हाला सामंजस्याची भूमिका घ्यायचीय
आपले मंत्री घाबरले आहेत, असा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला होता. त्या आरोपांना उत्तर देताना, शंभूराज देसाई म्हणाले की, मंत्री बिलकूल घाबरत नाहीत. आम्हाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आदेश दिला तर कोणत्याही परिस्थितीत जाऊ शकतो. पण आम्हाला सामंजस्याची भूमिका घ्यायची आहे. समन्वयातून यातून तोडगा काढायचा आहे. हे प्रकरण चिघळू न देता, केंद्राने यात मध्यस्थी करावी आणि समन्वयातून दोन्ही राज्यांमधील हा प्रश्न सोडवावा ही आमची भूमिका आहे. आततायीपणा करुन, कायदा हातात घेऊन आम्हाला हे प्रकरण चिघळवायचे नाही. मराठी भाषिकांना न्याय मिळाला पाहिजे, तिथल्या नागरिकांची जी भावना आहे, त्या भावनेच्या पाठिशी आम्ही आहोत, असे शंभूराज देसाई म्हणाले.
Join Our WhatsApp Community