बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रभावित होऊन शिवसेनेत आलो, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे आमदार संजय राठोड यांनी दिली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला वंदन करण्यासाठी आले असता, त्यांनी राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. नुकताच मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. त्यात संजय राठोड यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर शिंदे गटातील आमदारांनी छत्रपती शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी जाऊन वंदन केले. एकूण 9 मंत्री या ठिकाणी आले होते.
संजय राठोड पुढे म्हणाले की, काॅलेज जीवनामध्ये आम्ही शिवसैनिक झालो. कोणत्याही राजकीय पदाची अपेक्षा नव्हती. बाळासाहेब ठाकरेंचे विचार मनामध्ये होते. राष्ट्रहित किंवा अन्यायाच्या विरोधात लढणे, हिंदुत्व असे त्यांचे विचार ऐकून आम्ही प्रभावित झालो. तेव्हापासून राजकारणात आलो. 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण ही भूमिका घेऊन आम्ही काम केले. बाळासाहेबांच्या विचार आणि आशीर्वादामुळे चार-चार वेळा आमदार बनण्याची संधी आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांना मिळाली. आज मंत्री झाल्यानंतर, त्यांना वंदन करावे, म्हणून याठिकाणी आल्याचे, तसेच भविष्यातही त्यांच्या विचारानुसार, वाटचाल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
( हेही वाचा: शिंदे समर्थक मंत्र्यांचे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर; मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अभिवादन )
Join Our WhatsApp Community