शिवाजी महाराजांच्या अपमानावर गप्प बसणारे राज्यपालांइतकेच दोषी; उदयनराजे आक्रमक

136

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणा-या राज्यपालांइतकेच त्यांच्या वक्तव्यावर शांत बसणारे दोषी असल्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केला. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ मुंबईतील आझाद मैदानात आंदोलनाची घोषणा त्यांनी केली या आंदोलनाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे उदयनराजे यांनी म्हटले.

खासदार उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्त्वात शनिवारी किल्ले रायगड येथे निर्धार शिवसन्मानाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी उपस्थितांना संबोधताना खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्यपालांवर निशाणा साधला. छत्रपती शिवाजी महाराज यांनी सगळ्यांना एकत्र घेऊन स्वराज्य स्थापन केले. प्रत्येक जाती, धर्माचा सन्मान करण्याची शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली. त्याच, शिवरायांचा अपमान सुरु असल्याचे उदयनराजे यांनी म्हटले. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन करणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला. राज्यपालांच्या वक्तव्यावर राज्यातील नेते शांत का बसलेत असा सवालही त्यांनी केला.

( हेही वाचा: …तर आम्हांला बंगळूरु आणि बेळगावात महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी जागा द्या; राऊतांचे प्रत्युत्तर )

शिवाजी महाराजांचा अपमान हा आपला अपमान वाटत नाही का?

राज्यपाल हे राज्यातील सर्वोच्च पद आहे. राज्यपालांचे नाव घेऊन त्यांना मोठे करायचे नाही. पद मोठे आहे पण व्यक्ती नाही असा टोलाही राज्यपाल कोश्यारी यांना लगावला आहे. स्वत:च्या स्वार्थासाठी राजकीय मंडळींकडून त्यावर पांघरुण घालण्याचे काम सुरु असून, त्यांना लाज वाटली पाहिजे, असा हल्लाबोल उदयनराजे यांनी केला. शिवाजी महाराजांचा अपमान हा आपला अपमान वाटत नाही का? असा संतप्त सवालही उदयनराजे यांनी यावेळी केला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.