महाराष्ट्रातील सत्तासंघर्षातील एक महत्वाचा वाद म्हणजे शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह कुणाचे होणार शिंदे गटाचे की ठाकरे गटाचे होणार? हा विषय चर्चेत होता. केंद्रीय निवडणूक आयोगाने याविषयावर दोन्ही गटाची सुनावणी घेतली. त्यानंतर अखेर निवडणूक आयोगाने निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह दोन्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे. यामुळे हा निर्णय म्हणजे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी १८ फेब्रुवारीला पक्षाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला सर्व आमदार, खासदार आणि नेते उपस्थित राहणार आहेत. मातोश्रीवर ही बैठक होणार आहे.
( हेही वाचा : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आजारी पडलेल्या तिन्ही बिबट्याच्या बछड्यांचा मृत्यू)
आमदार-खासदार मुंबईच्या दिशेने रवाना
शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ही दोन्ही एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगाने दिले आहे. हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जात आहे. या निर्णयानंतर उद्धव ठाकरेंनी पक्षाची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आता पुढची भूमिका काय असणार यावर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीसाठी तात्काळ सर्व आमदार, खासदार मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.
दरम्यान निकालानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात लवकरात लवकर सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचेही ठाकरे यांनी सांगितले
Join Our WhatsApp Community