उद्धव ठाकरेंना विरोधकांची गरज नाही, ते स्वतःच स्वतःचे विरोधक आहेत

124

संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. त्या मुलाखतीचा पहिला भाग प्रसिद्ध झाला आहे. या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर सडकून टीका केली, असा आव आणला जात आहे. परंतु संजय राऊतांनी त्यांची मुलाखत घेतली हे टीकात्मक नाही का? त्यांना जर मुलाखत द्यायचीच होती तर ते एखाद्या चॅनलला व त्याच्या चॅनलच्या पत्रकाराला मुलाखत देऊ शकत होते.असो. ज्याची बॅट त्याची बॅटिंग हे बालपणीचं तत्व त्यांनी स्वीकारलंच असेल तर आपलाही नाइलाज आहे.

या मुलाखतीत ठाकरेंनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. पण अजूनही संजय राऊत किंवा उद्धव ठाकरे यांना आपण काय गमावलं आहे हे कळलेलं नाही. याचं कारण ते त्यांनी कमावलं नसून ते बाळासाहेबांनी कमावलं होतं, म्हणून जे गमावलं आहे त्याची किंमत त्यांना कळलेली नाही. उठाव केलेल्या आमदारांसाठी त्यांनी पालापाचोळा, सडलेली पाने, कपाळकरंटे, जन्म दिलेल्या आईला गिळणारे अशाप्रकारे शब्द वापरले आहेत.

( हेही वाचा: उद्या ते पंतप्रधान पदावरही दावा सांगतील, त्यामुळे भाजपवाल्यांनो सावधान; ठाकरेंचा शिंदेंना टोला )

आदित्य ठाकरे पक्ष सावरु शकतील?

त्यात नेहमीप्रमाणे विचित्र विनोद करुन त्यांनी स्वतःचा हशा देखील करुन घेतला आहे. मुळात आताची वेळ शब्दांचा मारा करायची नसून राहिलेला पक्ष सावरण्याची आहे. पक्ष सावरण्यासाठी त्यांनी आदित्य ठाकरेंना पाठवलं आहे. आदित्य ठाकरे यांना कसलाच अनुभव नाही, सामान्य शिवसैनिकांशी त्यांचा फारसा संबंध आलेला नाही, असं असताना ते पक्ष सावरु शकतील हे ठाकरेंना कोणी सांगितलं असेल?

स्वत: वरच टीका करतात की काय?

प्रत्येक वेळी जेव्हा संजय राऊत, आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे विरोधकांवर टीका करतात, तेव्हा ते स्वतःवरच टीका करत आहेत का? अशी दाट शंका येते. कारण ते बर्‍याचदा गद्दार असा शब्द वापरतात. २०१९ मध्ये भाजपाला फसवून त्यांनी महाविकास आघाडीची स्थापन केली होती. दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक वेळी खालच्या पातळीची टीका करुन आपण कोण आहोत? याचं प्रदर्शन आपण लोकांना घडवत असतो. तिसरा महत्वाचा मुद्दा प्रत्येकवेळी विचित्र विनोद करुन व नसलेली विनोद बुद्धी दाखवून आपण आपलाच हशा करत असतो. खरं पाहता बाळासाहेबांसारख्या मोठ्या नेत्याच्या सुपुत्राला हे करण्याची गरज नाही. या सर्व गोष्टी करुन आपण आपल्यावरच नकळत टीका करत आहोत हे ते विसरत चालले आहेत. उद्धव ठाकरेंना विरोधकांची गरज नाही ते स्वतःच स्वतःचे विरोधक आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.