“एक नेता, एक झेंडा, एक मैदान”… ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याचा टीझर लाॅन्च; पहा व्हिडीओ

186

शिंदे गटाने बुधवारी दसरा मेळाव्याचा टीझर रिलीज केला. आता ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याचा टीझर लाॅन्च करण्यात आला आहे. निष्ठेचा सागर उसळणार असे या टीझरमध्ये म्हटले आहे. उद्धव ठाकरे ज्या शैलीत भाषणाची सुरुवात करतात तेही या टीझरमध्ये दाखवण्यात आले आहे. जमलेल्या माझ्या तमाम हिंदु बांधवांनो, भगिनींनों आणि मातांनो… त्यांच्या भाषणाची ही सुरुवात या टीझरमध्ये दाखवण्यात आली आहे. एक नेता, एक झेंडा, एक मैदान.. असे कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आले आहे.

( हेही वाचा: एक नेता, एक पक्ष,एक विचार, एक लव्य,एक नाथ आणि बाळासाहेबांचा आवाज, शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचा टीझर रिलीज )

मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेनेला शिवाजी पार्क मैदानात दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी दिली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने शिवाजी पार्कमधील दसरा मेळाव्यासाठी जय्यत तयारी सुरु केली आहे. येत्या 5 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6:30 वाजता हा दसरा मेळावा होणार असून या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचेच प्रमुख भाषण होणार आहे. त्यामुळे मेळाव्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

टीझरमध्ये काय?

शिवसेनेचा हा टीझर अवघ्या 35 सेकंदाचा आहे. या टीझरच्या सुरुवातीलाच भगवे झेंडे आणि शिवसेनेच्या वाघाचे फोटो दाखवण्यात आले आहेत. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो दाखवण्यात आला आहे. याशिवाय जुन्या दस-या मेळाव्याची प्रचंड गर्दी या टीझरमध्ये दाखवण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.