ठाकरेंच्या शिवसैनिकांकडून बनावट स्टॅम्पचा वापर; 4 हजार 682 खोटी प्रतिज्ञापत्रे जप्त

165

मुंबईत खोट्या प्रतिज्ञापत्रांचा घोटाळा उघड झाला आहे. उद्धव ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रावर बनावट स्टॅम्पचा वापर करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणी वांद्रे येथील निर्मल नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मुंबईतून 4 हजार 682 खोटी प्रतिज्ञापत्रे पोलिसांनी जप्त केली आहेत. त्यामुळे ठाकरे गट अडचणीत आला आहे.

मुंबईत 4 हजार 682 खोटी प्रतिज्ञापत्रे बनवली गेल्याची धक्कादायक माहिती तपासादरम्यान समोर आली आहे. ठाकरे गटाने खोटी प्रतिज्ञापत्रे बनवल्याचा आरोप शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी केला आहे. क्राईम ब्रांचने मुंबईत मोठी कारवाई करत, वांद्रे, माहिम परिसरात धाडसत्र राबवले. या कारवाईदरम्यान पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बनावट कागदपत्रे हस्तगत केली आहेत. ही कारवाई अत्यंत गोपनीय ठेवण्यात आली होती.

( हेही वाचा: ठाकरे गटाचे चिन्ह ठरले; ‘हे’ असणार नवे चिन्ह )

धनुष्यबाण या चिन्हावरुन निवडणूक आयोगात शिंदे आणि ठाकरे गटाची लढाई सुरु आहे. त्यात खरी शिवसेना आमचीच हे सिद्ध करण्यासाठी ठाकरे गटाने सादर केलेले प्रतिज्ञापत्र ही बनावट रबर स्टॅम्पचा वापर करुन दिल्याचा धक्कादायक प्रकार तपासादरम्यान समोर आला आहे. या प्रतिज्ञा पत्रांसाठी मोठ्या प्रमाणात बनावट आयकार्डचा वापर करण्यात आल्याचेही समजते आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.