श्रीकांत शिंदे बसलेली खुर्ची नेमकी कोणाची? शिंदेंनीच दिले स्पष्टीकरण

खासदार श्रीकांत शिंदे यांचा एक फोटो राष्ट्रवादीचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी ट्वीट केला होता. या फोटोमध्ये श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसले आहेत, असा दावा करण्यात आला होता. मात्र आता यावर खासदार श्रीकांत शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मी खासदार आहे, कुठे बसायचे आणि कुठे नाही हे मला कळते. फोटोमध्ये दिसतंय ते ऑफिस घरातलं आहे. तसेच, ज्या खुर्चीवर मी बसलो आहे ती माझीच खुर्ची आहे. मात्र, माझ्या मागे दिसणारा बोर्ड हा तिथला नाही. माझ्या मागे हा बोर्ड होता याची मला कल्पनाही नव्हती असे स्पष्टीकरण श्रीकांत शिंदे यांनी दिले आहे.

( हेही वाचा “उरलेले दोनचार जणांना टिकवा, नाही तर…”, बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना टोला )

राष्ट्रवादीचा आरोप काय?

राष्ट्रवादीचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी एकनाथ शिंदेंचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांचा एक फोटो ट्वीट केला होता. त्या फोटोमध्ये ते मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसलेले दिसत आहेत. हा फोटो ट्वीट करत रविकांत वरपे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला होता.

खासदार श्रीकांत शिंदे यांना सुपर सीएम झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा. मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत त्यांचे चिरंजीव मुख्यमंत्री पदाचा कारभार सांभाळतात. लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरु आहे. हा कोणता राजधर्म आहे? असा कसा हा धर्मवीर? असा सवााल वरपे यांनी केला होता.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here