संजय राऊत 007; हे कोणाचे सीक्रेट एजेंट आहेत?

115

आमदार असो, खासदार असो किंवा शिवसेनेचे नेते असो, सर्वांचा रोख संजय राऊतांकडे जातो. आता विजय शिवतारे यांनी देखील संजय राऊतांवर धक्कादायक विधान केलं आहे. “हे बंड नाही, ही गद्दारी नाही, ही खुद्दारी आहे. आम्ही उद्धव ठाकरेंना कधीही डावलेले नाही. आम्ही उद्धव ठाकरेंना मानतो, आदित्य ठाकरेंना देखील तेवढंच मानतो. पण संजय राऊत नावाच्या माणसानं शिवसेनेची तारांबळ करून टाकली आहे. त्यांना स्किझोफ्रेनिया नावाचा एक मनोविकार झाला आहे. हा विकार सामान्य माणसाला होत नाही, अतिहुशार माणसालाच होतो, असे डॉक्टर सांगतात. अशा व्यक्तीला वेगवेगळे भास होत असतात, त्याला जे भास होतात, ते सर्व खरंच आहेत” असं विधान शिवतारेंनी केलेलं आहे.

( हेही वाचा : उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना कॉल; इगो संपल्यामुळे की इगो वाढल्यामुळे? )

राऊतांनी शिवसेनेची तारांबळ करु टाकली हे वाक्य अत्यंत महत्व आहे. त्याचबरोबर त्यांनी राऊतांवर गंभीर आरोप देखील केले आहेत. अनेक आमदारांचं मत आहे की ते उद्धव ठाकरेंसाठी नव्हे तर शरद पवारांसाठी काम करतात. ज्येष्ठ राजकीय पत्रकारांमध्ये अशी चर्चा रंगलेली आहे.

संजय राऊत हे कधीच शिवसेनेचे नव्हते

कै. बाळासाहेब ठाकरे यांनी संजय राऊतांना फार जवळ केलं नाही. महत्वाच्या चर्चेत देखील त्यांना सामील केलं नाही. कदाचित ते शिवसेनेतली खबर इतर कोणाला तरी देतात असा संशय बाळासाहेबांना वाटत असावा. म्हणूनच त्यांनी संजय राऊतांना चार हात लांब ठेवलं. पुढे ते उद्धव ठाकरेंच्या खूप जवळचे झाले. जे बाळासाहेबांना कळलं होतं, ते उद्धव ठाकरेंना का कळलं नाही? हा एक प्रश्नचिन्ह आहे. ठाकरेंना हे कळलं नाही म्हणूनच ठाकरेंना आज सगळे सोडून गेलेत.

शिवसेनेच्या नेत्यांच्या म्हणण्यानुसार संजय राऊत हे कधीच शिवसेनेचे नव्हते. ते शिवसेनेमध्ये पेरलेले एक सीक्रेट एजेंट आहेत. त्यांना नेहमी कै. बाळासाहेब ठाकरेंपेक्षा शरद पवार जवळचे वाटले आहेत. त्यांनी सबंध पक्ष पवारांना सोपवला होता. हे शिवसैनिकांना लक्षात आलं म्हणून हा उठाव झालेला आहे. संजय राऊत हे नेते, खासदार किंवा पत्रकार नसून ते पवारांचे सीक्रेट एजेंट आहेत, संजय राऊत 007 आहेत असं उठाव केलेल्या शिवसेना नेत्यांच्या सांगण्यावरुन वाटतं.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.