Maharashtra Satate Budget 2024 : राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार! सरकार ‘या’ घोषणा करण्याच्या तयारीत

131
Maharashtra Satate Budget 2024 : राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार! सरकार 'या' घोषणा करण्याच्या तयारीत
Maharashtra Satate Budget 2024 : राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार! सरकार 'या' घोषणा करण्याच्या तयारीत

महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे शुक्रवारी (28 जून) अर्थसंकल्प (Maharashtra Satate Budget 2024) सादर केला जाणार आहे. यावेळी राज्य सरकार तरुण, महिला, शेतकऱ्यांना आकर्षित करण्यासाठी मोठ्या घोषणा करण्याची शक्यता आहे. अर्थमंत्री अजित पवार हे विधिमंडळात अर्थसंकल्प सादर करतील. यावेळच्या अर्थसंकल्पात राज्य सरकार अनेक तरतुदी करण्याची शक्यता आहे. (Maharashtra Satate Budget 2024)

‘या’ मोठ्या घोषणांची शक्यता (Maharashtra Satate Budget 2024)

  1. मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना राबवून राज्यातील गरीब महिलांना 1200 ते 1500 रुपये दरमहा देण्याची तरतूद राज्य सरकार करू शकते. (Maharashtra Satate Budget 2024)
  2. बेरोजगार तरुणांनाही दरमहा पाच हजार रुपयांचा भत्ता देण्याचीही राज्य सरकार तरतूद करणय्चाी शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यातील सुमारे पाच लाख युवकांना या योजनेचा लाभ देण्याचा सरकारचा मानस असल्याचे बोलले जात आहे. ही तरतूद केल्यास सरकारचा हा एक ऐतिहासिक निर्णय म्हणावा लागेल. (Maharashtra Satate Budget 2024)
  3. राज्य सरकार शेतकऱ्यांसाठीही मोठी आणि भरीव तरतूद करण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार सरकार शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजनाही नव्याने लागू करू शकते. (Maharashtra Satate Budget 2024)
  4. सध्या राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा वाद चालू आहे. त्यामुळे या दोन्ही घटकांना खुश करण्यासाठी राज्य सरकार वेगवेगळ्या तरतुदी करण्याची शक्यता आहे. (Maharashtra Satate Budget 2024)
  5. गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करावी, अशी मागणी केली जाते. विधानसभा निवडणूक जवळ आलेली असताना राज्य सरकार अर्थसंकल्पाच्या माध्यमातून यावरही काही निर्णय घेते का? हे पाहावे लागणार आहे. (Maharashtra Satate Budget 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.