मंगळवारपासून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. त्यातच आता मंत्री बच्चू कडू यांनी एका वृत्तवाहिनीला फोनवरुन माहिती दिली आहे. मंत्री बच्चू कडू हे सध्या मंत्री एकनाथ शिंदेंसोबत आहेत. शिवसेनेच्या आमदारांकडे ज्या पद्धतीने लक्ष द्यायला हवे होते ते दिले जात नव्हते. त्यामुळे आमदारांमध्ये नाराजी होती, असे बच्चू कडू स्पष्टपणे म्हणाले.
निधी वाटपावरुन नाराजी
बंडखोर आमदारांसोबत भाजपचे संजय कुटे असल्याचे, बच्चू कडू यांनी सांगितले. त्यामुळे या बंडखोर आमदारांसोबत भाजप संपर्कात असल्याचे दिसत आहे. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांनी निधी वाटपावरुन आमदारांची मोठी नाराजी असल्याचेही सांगितले आहे.
( हेही वाचा: राऊत म्हणाले, “जास्तीत जास्त काय होईल, सत्ता जाईल पण…” )
आणखी काही आमदार संपर्कात
बच्चू कडू पुढे म्हणाले की, बातम्या दाखवल्या जाताहेत की काही आमदार दबावात आहेत किंवा काहींना मनाविरुद्ध तिथे थांबवले गेले आहे. मात्र, असा कोणताही प्रकार नसल्याचे कडू यांनी सांगितले आहे. येथे आलेले सर्व आमदार आपल्या मनाने आले आहेत. कोणालाही बळजबरी केलेली नाही. तसेच, आमदारांची संख्या 50 पर्यंत जाऊ शकते. जास्त आमदारांचा या प्रकाराला प्रतिसाद मिळत आहे, अजून काही आमदार येण्यासाठी तयार असल्याचेही त्यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community