राज्यात ‘असे’ होतेय शिक्षणाचे इस्लामीकरण!

141

समाजमाध्यमांवर सध्या एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. यात एका मराठी गृहस्थाने, इयत्ता चौथीत शिक्षण घेत असलेल्या मुलीच्या बालभारती पुस्तकात असलेल्या ‘ईदगाह’ नावाच्या पुस्तकावर आक्षेप नोंदवला आहे. मराठीच्या पाठ्यक्रमिक पुस्तकातून हिंदू धर्माचे शिक्षण देण्याऐवजी शाळकरी मुलांवर मुस्लिम धर्माचे संस्कार बिंबवले जात आहेत, असा गंभीर आरोप या गृहस्थाने केला आहे.

( हेही वाचा : काळजी नको! आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं १०० टक्के लॉकडाऊनची गरज नाही )

अभ्यासाच्या माध्यमातून मुस्लिम धर्माचा शिरकाव

चौथीच्या अभ्यासक्रमात ‘ईदगाह’ नावाच्या धड्यावर सामान्य पालकाने आक्षेप घेतला आहे. ‘नमस्कार, जय शिवराय मित्रांनो, माझी मुलगी अपूर्वा इयत्ता चौथीमध्ये आहे. ती अभ्यास करत होती, या चौथीच्या अभ्यासक्रमात मराठी बालभारतीच्या पुस्तकात ‘इदगाह’ नावाचा धडा आहे. हा धडा ती वाचत असताना मी पाहिले. आपला धर्म आपली संस्कृती याचे शिक्षण न देता मुस्लिम धर्माच्या अनुयायांनी हळूहळू हिंदू धर्मात कसा शिरकाव करायचा, बालमनावर कसं बिंबवायचे, याचे शिक्षण देणे चालू आहेत’, असा आरोप या गृहस्थाने केला आहे. तसेच या धड्याच्या स्वाध्यायामध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नांवरही संबंधित पालकाने नाराजी व्यक्त केली आहे.

Balbharatiयामधील प्रश्न

१. ईदची प्रार्थना कशी चालते?, त्याचे वर्णन करा
२. ईदच्या दिवशी काय काय करतात?
३. इदगाहच्या दिवशी हमीदच्या मित्रांनी काय केले?

अशाप्रकारे मुलांवर इस्लामी धर्माचे संस्कार बिंबवले जात आहेत, हे चुकीचे आहे. मुस्लिम धर्माची शाळा त्यांच्या मशिदीमध्येच भरवली जाते आणि त्यांना त्यांच्या धर्माचे शिक्षण दिले जाते. पण आपल्या मुलांच्या मनावर मात्र बॉलिवूड, अभ्यासाच्या माध्यमातून मुस्लिम धर्माचा शिरकाव होत आहे, असेही संबंधित गृहस्थाने या व्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्ट केले आहे.

ईद, नमाज आणि रमजानचे बिंबवले महत्व

या धड्यात रमजान महिन्याचे महत्व, ईदच्या दिवसाचे महत्व, ईदच्या दिवशी होत असलेल्या नमाज पठाणाचे महत्व, नमाज पठण होत असतानाचे वातावरण इत्यादी प्रसंगांचे नाट्यमय रूपात लिखाण करून त्याविषयी मुलांमध्ये उत्सुकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.