मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर

105

राज्य निवडणूक आयोगाने परिपत्रक जाहीर केले आहे. त्यामध्ये 13 जून 2022 रोजी राज्यातील 13 महापालिकांसाठी आरक्षण सोडत होणार आहे. त्यामुळे आता या महापालिकांच्या निवडणुकांसाठी तयारी सुरु झाल्याचे संकेत मिळत आहेत. मात्र यात इतर मागास वर्गीय समाजासाठीच्या आरक्षणाशिवाय ही आरक्षण सोडत होणार आहे. परंतू त्या पाठोपाठ मुंबई महापालिकेसाठी आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर केला आहे.

मुंबई महापालिकेचा आरक्षण सोडत कार्यक्रम कसा असेल?

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडतीसंदर्भातील पहिली नोटीस २७ मे रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. ३१ मे रोजी अनुसूचित जाती (महिला व पुरुष), अनुसूचित जमाती (महिला व पुरुष) असा उल्लेख कारवा. ही आरक्षण सोडत १ जून रोजी वृत्तपत्रात प्रसिद्ध करुन हरकती मागवल्या जातील. आरक्षण सोडतीवरील हरकती आणि सूचना १ ते ६ जून दरम्यान स्वीकारल्या जातील. अंतिम आरक्षण सोडत १३ जून रोजी राजपत्रात प्रसिद्ध केली जाईल.

(हेही वाचा भारतीय रेल्वे दहशतवाद्यांच्या रडारवर, आयएसआयची स्लीपर सेल्स अ‍ॅक्टिव्ह)

सर्वोच्च न्यायालयाने विशेष अनुमती याचिका (सिव्हील) १९७५६/२०२१ मध्ये दि. ४ मे, २०२२ रोजी दिलेल्या आदेशास अनुसरुन राज्य निवडणूक आयोगाने महानगरपालिकांची अंतिम प्रभाग रचना प्रसिध्द करण्यासंदर्भात कार्यक्रम दिला होता. त्यास अनुसरुन १३ महानगरपालिकांची अंतिम प्रभाग रचना शासन राजपत्रात प्रसिध्द करण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.