संजय शिरसाट, कालिदास कोळंबकर नवे तालिका अध्यक्ष

77
महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदी संजय शिरसाट, कालिदास कोळंबकर यांच्यासह चार जणांची निवड करण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी यासंदर्भात घोषणा केली.
राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन बुधवारी १७ ऑगस्टपासून सुरू झाले. यात संजय शिरसाट (शिवसेना, संभाजीनगर पश्चिम), कालिदास कोळंबकर (भाजप- वडाळा), मनोहर कालिकापुरे (राष्ट्रवादी, अर्जुनी-मोरगाव) आणि शिरीष चौधरी (काँग्रेस, रावेर) यांची तालिका अध्यक्षपदी निवड करण्यात आली. विधानसभा अध्यक्षांच्या अनुपस्थितीत सभागृहाचे कामकाज पाहण्याची जबाबदारी तालिकाध्यक्षांवर असते. प्रत्येक पक्षाकडून विधानसभेतील अभ्यासू आमदारांची त्यासाठी निवड केली जाते.

( हेही वाचा: स्टीलच्या कचऱ्यापासून बनवणार पावसात खराब न होणारे रस्ते; ‘या’ सरकारचा निर्णय )

प्रत्येक अधिवेशनात तालिकाध्यक्षपदी विविध आमदारांचे अनुभव आणि ज्येष्ठतेनुसार संबंधित पक्षाचे विधिमंडळ नेते शिफारस करत असतात. त्यानुसार ही निवड होत असते. मुंबईत सुरू झालेले पावसाळी अधिवेशन २५ ऑगस्टपर्यंत चालेल.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.