राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, तिसऱ्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले असतानाच आता महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या (Vidhan Parishad) ४ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. यासाठी १० जून रोजी मतदान होणार आहे, तसेच १३ जून रोजी मतमोजणी होणार आहे.
मुंबई आणि कोकण पदवीधर मतदारसंघाचा तर मुंबई आणि नाशिक शिक्षक मतदार संघ या चार मतदारसंघातील आमदारांचा कार्यकाळ ७ जुलै रोजी संपणार आहे. विधान परिषदेमध्ये (Vidhan Parishad) असलेल्या एकूण सदस्यांपैकी ७ सदस्य हे शिक्षक मतदार संघातील तर ७ सदस्य हे पदवीधर मतदारसंघातून निवडून येतात. यातील दोन पदवीधर मतदारसंघातील आणि दोन शिक्षक मतदार संघातील आमदारांचा कार्यकाल ७ जुलै रोजी संपत आहे. त्यामुळे या चार जागांसाठी निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.
कोणत्या आमदारांचा कालावधी संपणार?
- मुंबई पदवीधर मतदारसंघ – विलास विनायक पोतनीस (ठाकरे गट)
- कोकण पदवीधर मतदारसंघ निरंजन वसंत डावखरे (भाजप)
- नाशिक शिक्षक मतदारसंघ किशोर भिकाजी दराडे (ठाकरे गट)
- मुंबई शिक्षक मतदारसंघ कपिल हरिश्चंद्र पाटील (लोकभारती)
कसे असतील निवडणुकीचे टप्पे?
- १५ मे – निवडणूक प्रक्रियेला सुरुवात
- २२ मे – अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिनांक
- २४ मे – दाखल झालेल्या अर्जाची छाननी
- २७ मे अर्ज मागे घेण्यासाठी अंतिम दिनांक
- १० जून – प्रत्यक्ष मतदान
- १३ जून – मतमोजणी
Join Our WhatsApp Community