महाराष्ट्र राज्याचे पर्यटन, कौशल्य विकास, उद्योजकता आणि महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आपल्या सेवा विवेक प्रकल्पाला इच्छिक भेट दिली. त्याप्रसंगी संस्थेतील आदिवासी महिलांनी मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे औक्षण करून स्वागत केले.
त्यावेळी संस्थेच्या कामाची पाहणी केली. संस्थेचे संचालक प्रदीप गुप्ता व मुख्य कार्यकारी अधिकारी लूकेश बंड यांनी मंत्री महोदयांना संस्थेची माहिती दिली. तसेच महिलांनी बांबू हस्तकला पासून तयार केलेल्या विविध वस्तूची पाहणी मंगलप्रभात लोढा यांनी केली. त्या प्रसंगी त्यांनी आदिवासी महिलांच्या कलागुणांची प्रशंसा करताना संस्थेला सामजिक कार्यात ह्या पुढे राज्य सरकार तर्फे विविध प्रकारे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
सेवा विवेक सामाजिक संस्था गेल्या अनेक वर्षांपासून महिला सक्षमीकरणासाठी पालघर जिल्ह्यातील आदिवासी गरुजू महिलांना घरकाम सांभाळून त्यांना आर्थिक हातभार लाभावा त्यांना सन्मानजनक रोजगार प्राप्त व्हावा या हेतूने सेवा विवेकने पुढाकार घेतला आहे. अशा महिलांना मोफत बांबू हस्तकलचे प्रशिक्षण दिले जाते. पालघर जिल्हातील आदिवासी महिलांना बांबू हस्तकलेचे प्रशिक्षण देऊन प्रशिक्षित करण्यात येत असून आतापर्यंत शेकडोहून अधिक महिलांनी प्रशिक्षण देण्यात आले आहे. हे प्रशिक्षण पूर्ण घेतल्यावर महिलांनी बांबूपासून उत्तम दर्जेदार पर्यावरणपूरक उत्पादने तयार करण्यात हातखंडा मिळवला आहे.
( हेही वाचा: स्वबळावर शिवसेनेचा मुख्यमंत्री निर्माण करु; राऊतांचा सरकारवर हल्लाबोल )
उत्पादनाच्या दर्जेदारपणामुळे चांगली मागणी
यावर्षी महिलांनी बनवलेल्या राखी व कंदिलांना विदेशातही मागणी होती. तसेच, वर्षभर महिला इतर वस्तू मोठ्या प्रमाणात तयार करतात यामध्ये बांबूपासून विविध प्रकारचे पेन होल्डर ,मोबाईल होल्डर , पात्राधर, फिंगर जॉइंट ट्रे तयार आदी सारख्या ३६ बांबू हस्तकलेच्या आकर्षक वस्तू तयार करतात. या मागणीचा थेट परिणाम पालघर जिल्हातील आदिवासी महिलांच्या रोजगार निर्मितीवर होत असून त्यांना प्रशिक्षणानंतर घरच्या घरी रोजची कामे सांभाळून फावल्या वेळेत बांबू काम करून रोजगाराची मोठी संधी मिळाली आहे. चांगला रोजगार प्राप्त होत असल्यामुळे महिला घरची जबाबदारी स्वीकारून मुलांना चांगल्या प्रकारचे शिक्षण देत आहे. गेल्या वर्षी सेवा विवेकच्या कार्याचा माजी राष्ट्रपती व महामहीम राज्यपाल यांनी कौतुक केले आहे. माजी राष्ट्रपतींद्वारे हस्तकला प्रशिक्षित आदिवासी महिलांचा सत्कार करण्यात आला. आज संस्थेतील अनेक प्रशिक्षण घेतलेल्या महिला ह्या संस्थेच्या प्रशिक्षक म्हणून काम पाहत आहेत तसेच नवीन महिलांना त्या प्रशिक्षण देत आहेत. यामुळेच आदिवासी समाजातील महिलांचा आत्मविश्वास वाढला आहे.
Join Our WhatsApp Community