जलयुक्त शिवारला मोठे यश, कसे ते वाचा…

ठाकरे सरकारच्या काळात बंद झालेली जलयुक्त शिवार योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने पुन्हा सुरू केली. आता या योजनेला मोठे यश मिळाले आहे.

208
success of Jalyukta Shivar, maharashtra state rank first in water conservation scheme
जलयुक्त शिवारला मोठे यश, कसे ते वाचा...

केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने भारतातील जलाशयांच्या गणनेचा पहिला अहवाल जाहीर केला असून, त्यात महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक आला आहे. जलयुक्त शिवार योजनेमुळे राज्याला हे यश मिळाले आहे. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेचे अभिनंदन केले आहे.

जलयुक्त शिवाराचे फायदे

या अहवालाबाबत माहिती देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने भारतातील जलाशयांच्या गणनेचा पहिला अहवाल जाहीर केला असून, त्यात आपल्या महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक आला आहे, हे सांगताना मला अत्यानंद होतो. जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे आदी योजना एकत्रितपणे राबविल्याचे हे यश आहे.

जलसंवर्धनात महाराष्ट्र पहिला

अन्य राज्यात तळी आणि जलसाठे अधिक असली तरी जलसंवर्धनाच्या बाबतीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आला आहे. २०१८-१९ या वर्षात ही गणना करण्यात आली होती. या अहवालातील महत्त्वाचे निरीक्षण म्हणजे बहुसंख्य जलसाठे हे जलसंवर्धन योजनांमधील आहेत.

(हेही वाचा –  बारसू रिफायनरीबाबत उदय सामंत आणि शरद पवारांमध्ये काय झाली चर्चा?)

जलयुक्त शिवार आणि अन्य जलसंवर्धनाच्या योजनांना लोकचळवळ बनविणार्‍या महाराष्ट्रातील सर्व नागरिकांचे, सामाजिक संघटनांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी मन:पूर्वक अभिनंदन केले असून, या कार्यात सहभागी सर्वांचे आभार सुद्धा मानले आहेत. हे आपल्या सर्वांचे सामूहिक यश आहे. आता जलयुक्त शिवार २.० अभियान सुद्धा असेच सर्वांनी यशस्वी करावे, असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.