राणांनी तक्रार करावी, कारवाई केली जाईल! चाकणकरांचे मोठे विधान

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या अटकेनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले. आपल्यावर अन्याय झाल्याचे म्हणत राणा दाम्पत्याने राज्य सरकार विरोधात थेट दिल्लीत तक्रार केली आहे. याच पार्श्वभूमीवर आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी वक्तव्य केले आहे.

खासदार नवनीत राणा यांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाची राज्य महिला आयोगाकडे तक्रार करावी. त्यांच्या तक्रारीत काही तथ्य आढळल्यास नक्कीच कारवाई करण्यात येईल, असे चाकणकर यांनी म्हटले आहे.

(हेही वाचाः पवार म्हणतात, अनिल देशमुख लवकरच बाहेर येतील)

निश्चित कारवाई होईल

खासदार नवनीत यांना जो काही अनुभव आला त्याबद्दल त्यांची जी काही तक्रार असेल ती त्यांनी राज्य महिला आयोगाकडे दाखल करावी. राज्य महिला आयोग तक्रारीसंदर्भात पोलिसांकडून सगळी माहिती घेईल आणि त्यात काही तथ्य आढळल्यास त्याबाबत कारवाई करण्याचे निर्देश राज्य महिला आयोगाकडून देण्यात येतील, अशी ग्वाही या आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली आहे.

(हेही वाचाः नवनीत राणांच्या तक्रारींची केंद्राकडून दखल; 23 मे रोजी सुनावणी)

राणांची केंद्राकडे तक्रार

उद्धव ठाकरे यांच्या गुंडांकडून आमच्या अमरावती आणि मुंबईतील घरांवर हल्ला करण्यात आला. त्याविरोधात आम्ही तक्रार दाखल केली आहे. त्यावर अजून कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे आणि राज्य सरकारची तक्रार केली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here