राज्यात सध्या महायुतीचे सरकार आले असून बांगलादेशी व रोहिंग्याचा शोध घेतला जात आहे. अनेक प्रकरणात यांचा हात असल्याचे समोर आल्यानंतर आता राज्य सरकारने कडक पावले उचलली आहेत. अशातच भाजपाचे नेते तथा राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी बांगलादेशी व रोहिंग्यांवरून (Bangladeshi and Rohingya infiltrators) पुन्हा एकदा मुस्लिम समाजाला टार्गेट केलं आहे. त्यांनी चंद्रपूर (Nitesh Rane Chandrapur) येथील सभेत यावरून लव्ह जिहादचा मुद्दा उपस्थित करताना, आता राज्यात हिंदूचे रक्षण करणारे सरकार आले आहे. आता धर्मांतर खपवून घेणार नाही, असा इशारा दिला आहे. तर राज्यात लवकरच धर्मांतर विरोधी कायदा आणू, बांगलादेशी व रोहिंग्याचा शोध घेऊन त्यांना परत पाठवू, असे आश्वासन दिले आहे. (Nitesh Rane)
चंद्रपूरमधील गांधी चौक (Chandrapur Gandhi Chowk) येथे आयोजित हिंदू धर्म सभेत (Hindu Dharma Sabha CHANDRAPUR) जनतेला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी, राज्यात सर्वत्र हिरव्या सापांची वळवळ सुरू आहे. लव जिहाद प्रकरणातून हिंदू मुलींची केली जातेय. त्यांची वळवळ कमी झाली नाही तर प्रत्येकाला आतमध्ये टाकू हेच सांगायला येथे आलोय. असे विधान नितेश राणे यांनी केले.
सभेत नितेश राणे म्हणाले की, हिंदू समाजाच्या विरोधात भूमिका घेतली तर जागा दाखवू. तेव्हा तुमचा पाकिस्तान मध्ये बसलेला अब्बा काही करू शकणार नाही. हिंदू समाजातील मुलीचे आयुष्य जिहादी उद्ध्वस्त करीत आहेत. हिंदू समाजाकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्या स्थान नाही, हिंदू समाजाचे बाप सरकारमध्ये आहे. उगाच वळवळ राज्यात करायची नाही अन्यथा गाठ माझ्याशी आहे. धर्मांतर खापवून घेणार नाही. राज्यात सर्वात कडक धर्मांतर विरोधी कायदा लवकरच आणू. महविकास आघाडी सरकारच्या काळात हे सर्व चालले. आता चालणार नाही.
(हेही वाचा – Assam ते म्यानमारच्या सीमेलगतची ७२ एकरवरील अफूची शेती पोलिसांनी केली नष्ट; मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमांनी दिली माहिती)
… तर शाहरुख, सलमानचा कार्यक्रम करू
राज्यात सरकार आणण्यासाठी हिंदू पाठीशी राहिला. त्यामुळे हिंदू समाजासाठी काम करणार आहे. रोहिंग्यांवरून राज्याच्या बाहेर काढण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) करीत आहे. तेव्हा तुम्ही बॅग भरा आणि पाकिस्तानात चालते व्हा असेही राणे म्हणाले. “शाहरुख खान व सलमान खान आमच्या हिंदू बहिणीकडे वाकड्या नजरेने बघत असेल तर माझ्याकडे या.” त्यांची नावे द्या त्यांचा तिथेच बंदोबस्त व कार्यक्रम करू असेही राणे म्हणाले. तिरंगा झेंडा मंत्रालयात फडकातो आहे. मात्र त्यापेक्षाही मोठा भगवा झेंडा मंत्रालयावर फडकतो आहे हे लक्षात ठेवा. मी मंत्री म्हणून नाही तर हिंदू म्हणून तुमच्याशी संवाद साधायला आलो आहे असेही राणे म्हणाले.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community