लोकसभा 2024 च्या निवडणुकीची (Lok Sabha Election 2024) रणधुमाळी संपली असून आता राज्यात विधान परिषदेच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारांची निवड प्रक्रियाही राजकीय पक्षांनी चालू केली होती. फक्त निवडणूक आयोग या निवडणुकीची घोषणा कधी करणार याची सर्वांना प्रतीक्षा होती. दरम्यान, आता ही प्रतीक्षा संपली असून निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणुकीची घोषणा केली आहे. त्याबाबतचे वेळापत्रकही निवडणूक आयोगाने जारी केले आहे. (Maharashtra Vidhan Parishad 2024)
महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणूक 12 जुलै रोजी राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या अवघ्या काही महिन्यांपूर्वी म्हणजे 27 जुलै रोजी निवृत्त होणाऱ्या 11 आमदारांपैकी चार भाजपचे, दोन काँग्रेसचे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, उद्धव ठाकरे यांची शिवसेना, शेतकरी आणि कामगार पक्ष आणि राष्ट्रीय समाज पक्षाकडे प्रत्येकी एक जागा आहे.
असा असेल निवडणूक कार्यक्रम
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी येत्या 12 जुलै रोजी मतदान होईल. त्याच दिवशी म्हणजेच 12 जुलै रोजी निकाल जाहीर केला जाईल. या निवडणुकीसाठी येत्या 25 जून रोजी निवडणूक आयोगाकडून अधिसचून जारी केली जाईल. त्यानंतर उमेदवारांना 2 जुलैपर्यंत आपला उमेदवारी अर्ज दाखल करता येईल. 3 जुलै रोजी अर्जांची छानणी केली जाईल. तर उमेदवारांना आपला उमेदवारी अर्ज 5 जुलैपर्यंत मागे घेता येईल. 12 जुलै रोजी या निवडणुकीसाठी प्रत्यक्ष मतदान होईल. सकाळी नऊ ते चार वाजेपर्यंत यासाठी मतदान करता येईल. 12 जुलै रोजीच मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे. (Maharashtra Vidhan Parishad 2024)
(हेही वाचा – Nana Patole यांना सत्तेची मस्ती आली आहे का ?; पाय धुवून घेण्याच्या प्रकरणावरून चौफेर टीका)
जयंत पाटील, महादेव जानकर यांचा कार्यकाळ पूर्ण
कार्यकाळ पूर्ण होत असलेल्या विधान परिषदेच्या आमदारांमध्ये डॉ. मनिषा श्यामसुंदर कायंदे, विजय विठ्ठल गिरकर, अब्दुल्ला खान ए. लतीफ खान दुर्रानी, निलय मधुकर नाईक, ॲड. अनिल दत्तात्रय परब, रमेश नारायण पाटील, रामराव बाळाजीराव पाटील, डॉ. वजाहत मिर्झा अथर मिर्झा, डॉ. प्रज्ञा राजीव सातव, महादेव जगन्नाथ जानकर, जयंत प्रभाकर पाटील यांचा समावेश आहे. (Maharashtra Vidhan Parishad 2024)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community