Maharashtra Vidhan Parishad : २९ जुलैला राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार वितरण

109
Maharashtra Vidhan Parishad : २९ जुलैला राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार वितरण

महाराष्ट्र विधानपरिषद शतक महोत्सवानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत येत्या २९ जुलैला “वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्व” या ग्रंथाचे प्रकाशन तसेच विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्ही सभागृहातील निवड केलेल्या सदस्यांना “उत्कृष्ट संसदपटू” आणि “उत्कृष्ट भाषण” पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. (Maharashtra Vidhan Parishad)

(हेही वाचा – उदय सामंत यांचे Manoj Jarange Patil यांना आवाहन; म्हणाले…)

विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर आणि विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी बुधवारी (२४ जुलै) विधान भवनात आयोजित पत्रकार परिषदेत वरील माहिती दिली. विधानभवनच्या मध्यवर्ती सभागृहात दुपारी साडेतीन ते संध्याकाळी पाच या वेळेत हा कार्यक्रम होणार आहे. या समारंभाला राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील आदी उपस्थित राहणार आहेत. (Maharashtra Vidhan Parishad)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.