विदर्भात फडणवीसांची किमया, महाविकास आघाडीची मते फुटली

103

राज्याच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस या नावाचा आजही दबदबा पहायला मिळतो. याचाच प्रत्यय विधान परिषदेच्या निकालावरून पुन्हा एकदा पहायला मिळाला. विदर्भातील नागपूर आणि अकोला पोट निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला आणि विदर्भाचे किंग देवेंद्र फडणवीस हेच असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. नागपूरमध्ये चंद्रशेखर बावनकुळे तर अकोला वाशिम बुलडाणा मतदारसंघात भाजपचे वंसत खंडेलवाल विजयी झाले. यामुळे राज्यात ठाकरे सरकार असूनही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपने जोरदार यश मिळवले आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया गेल्या तीन टर्मपासून आमदार होते. त्यांचा पराभव हा शिवसेनेसाठी धक्का मानला जातोय.

महाविकास आघाडीची मते फुटली

नागपूर स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघ भाजपकडे होती. भाजपने ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना संधी दिली होती. चंद्रशेखर बावनकुळे यांना 362 मतं मिळाली आहेत. काँग्रेस समर्थित उमेदवार 186 मतं मिळाली आहेत. त्यामुळे नागपूरमध्ये भाजपने जागाच जिकली नाही तर महाविकास आघाडीची मते फोडण्याची किमया केली.

(हेही वाचा – महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या ‘या’ दोन्ही जागांवर ‘कमळ’ फुललं!)

अकोल्यात सेनेला दिला धक्का

अकोला-वाशिम-बुलडाणा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघात वसंत खंडेलवाल यांना 443 मते मिळाली. तर, शिवसेना-महाविकास आघाडीचे उमेदवार गोपीकिशन बाजोरिया यांना 334 मते मिळाली. महाविकास आघाडीचे जवळपास 80 मते फुटली असल्याचे समोर आले आहे. त्याशिवाय 31 मते अवैध ठरली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.