महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या (Maharashtra Vidhan Parishad) पाच जागांसाठी महायुतीचे उमेदवार जाहीर झाले आहेत. शिवसेनेनं (Shivsena) चंद्रकांत रघुवंशी आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं (NCP) संजय खोडके यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. भाजपकडून (BJP) संदीप जोशी, संजय केनेकर आणि दादाराव केचे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. (Maharashtra Vidhan Parishad)
हेही वाचा-मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या हस्ते भिवंडीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचं लोकार्पण !
या पाच जागांची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या विधानपरिषदेतील आमदार विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानं त्या जागा रिक्त झाल्या होत्या. शिवसेनेचे आमशा पाडवी, राष्ट्रवादीचे राजेश विटेकर आणि भाजपचे प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर आणि रमेश कराड हे विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानं त्यांचं परिषेदतील सदस्यत्व संपुष्टात आलं होतं. या रिक्त जागांसाठी विधानपरिषदेची पोटनिवडणुक जाहीर झाली आहे. (Maharashtra Vidhan Parishad)
हेही वाचा-Indian Navy च्या ताफ्यात दुसरी स्फोटकेवाहिका नौका दाखल; काय आहेत वैशिष्ट्ये?
विधानपरिषदेच्या रिक्त जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. उद्या (18 मार्च) ला अर्जांची छाननी होईल. त्यानंतर 20 मार्चपर्यंत अर्ज मागं घेण्याची मुदत आहे. तर, मतदानाची तारीख 27 मार्च आहे. मात्र, पाचपेक्षा अधिक अर्ज आले नाहीत तर निवडणूक बिनविरोध होऊ शकते. (Maharashtra Vidhan Parishad)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community