Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : गडचिरोलीत 111 वर्षाच्या आजीने प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन केले मतदान!

60
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : गडचिरोलीत 111 वर्षाच्या आजीने प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन केले मतदान!
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : गडचिरोलीत 111 वर्षाच्या आजीने प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन केले मतदान!

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) मतदान प्रक्रिया आज (20 नोव्हेंबर) पार पडत आहे. मतदार मोठ्या उत्साहाने मतदानासाठी बाहेर पडले आहेत. सकाळी ७ वाजेपासून प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली आहे. लोकशाहीच्या या उत्सवात तरुण मतदारांनाही लाजवणारा उत्साह दाखवत एका १११ वर्षांच्या आजींनी मतदान केंद्रावर जाऊन प्रत्यक्ष मतदान केले. नक्षलग्रस्त, आदिवासी बहुल समजल्या जाणाऱ्या गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यात वयोवृद्ध आजीने मतदान (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) करून नवमतदारांना प्रेरणा देण्याचे काम केले आहे.

(हेही वाचा-महाराष्ट्रातील जनता विकासाला भरभरुन मतदान करेल: CM Eknath Shinde)

फुलमती बिनोद सरकार (१११) (Phulmati Binod Sarkar) असे त्या आजींचे नाव असून त्या मुलचेरा तालुक्यातील गोविंदपूर येथील रहिवासी आहेत. फुलमती सरकार यांचा जन्म १ जानेवारी १९१३ रोजी झाला. आजीला चालता येत नसल्याने प्रशासनाने चारचाकी वाहन आणि व्हील चेअरची व्यवस्था केली होती. आजीने प्रत्यक्ष मतदान करत मतदारांमध्ये उत्साह निर्माण केला. आजींच्या मतदानाचा उत्साह कौतुकास्पद होता. तर मतदानाकडे पाठ फिरविणाऱ्या तरुण वर्गासाठी १११ वर्षांच्या आजींचा हा उत्साह आदर्शवत होता. (Maharashtra Vidhan Sabha Election 2024)

(हेही वाचा-Maharashtra Assembly Election 2024: मनसेचं इंजिन नक्कीच जोरदार धावेल; Amit Thackeray यांनी व्यक्त केला विश्वास)

भारत निवडणूक आयोगाने ८५ वर्षावरील मतदारांसाठी गृह मतदानाची सोय उपलब्ध करून दिली होती. त्या कालावधीत गृह मतदान प्रक्रिया सुद्धा राबविण्यात आली. मात्र ,काही मतदार मतदान केंद्रावरच जाऊन प्रत्यक्ष मतदान करण्याचा निर्णय घेतला. ते मतदार आज प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन मतदान करत आहेत. त्यात फुलमती बिनोद सरकार या आजींचा देखील समावेश होता. (Maharashtra Vidhan Sabha Election 2024)

लोकशाहीच्या उत्सवात तब्बल १११ वय असलेल्या या आजींनी प्रत्यक्ष सहभाग घेऊन मतदान करणे ही अभिमानास्पद बाब आहे. त्यांनी गृह मतदान नाकारून लोकशाहीच्या उत्सवात प्रत्यक्ष सहभाग घेतला.एवढेच नव्हेतर तिने आपल्या बांगला भाषेत सर्वांना मतदान करण्याचे आवाहन देखील केले. (Maharashtra Vidhan Sabha Election 2024)

अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी शाल देऊन केले स्वागत

फुलमती बिनोद सरकार या आजीला प्रशासनाने चारचाकी वाहनातून मतदान केंद्रावर आणले.त्यांनतर शालेय विद्यार्थी,गावकरी तसेच प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पुष्पांचा वर्षाव करत मतदान केंद्राच्या आवारात स्वागत केले.त्यांनतर आजीने उत्साहात मतदानाचा हक्क बजावला.त्यानंतर अहेरीचे अप्पर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी फुलमती बिनोद सरकार यांना शाल,श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देत स्वागत केले.यावेळी मुलचेराचे गटविकास अधिकारी एल. बी. जुवारे,पुरवठा अधिकारी इंगोले,तलाठी रितेश चिंदमवार, ग्रामपंचायतचे सचिव अक्षय कुळमेथे तसेच आदी कर्मचारी उपस्थित होते. (Maharashtra Vidhan Sabha Election 2024)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.