महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) निकाल (२३ नोव्हें.) समोर आला आहे. यात महायुतीने अभूतपूर्व यश मिळवलं. एकूण 288 जागांसाठी मतदान झाले. यापैकी तब्बल 132 जागांवर भाजपाने दणदणीत विजय नोंदवला आहे. या जागांसह भाजपा (BJP) हा राज्यातील सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. सलग तिसऱ्या निवडणुकीत भाजपाने 100 पेक्षा अधिक जागा मिळवल्या आहेत. या निवडणुकीत भाजपनंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा पक्ष दुसरा सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. या पक्षाला एकूण 57 जागा मिळाल्या आहेत. तर अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पक्षाला एकूण 41 जागांवर विजय मिळाला आहे. (Maharashtra Vidhan Sabha Election 2024)
यावेळी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना शिंदे पक्षाचे गुवाहाटीला (Guwahati) गेलेले पाच आमदार पराभूत झाले आहेत. पराभूत आमदारांमध्ये सदा सरवणकर, यामिनी जाधव, शहाजीबापू पाटील, संजय रायमूलकर आणि ज्ञानराच चौगुले यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जून 2022 मध्ये शिवसेनेतून बाहेर पडले होते. ते शिवसेना आणि अपक्ष असे 50 आमदार सोबत घेऊन बाहेर पडले होते. त्यामुळे उद्धव ठाकरेंचे सरकार पडले होते. (Maharashtra Vidhan Sabha Election 2024)
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर भाजपसोबत सत्ता स्थापन केली होती. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडील धनुष्यबाण हे चिन्हही निवडणूक आयोगाने त्यांना दिले होते. विधानसभा निवडणुकीत बंडखोरांमधील एकही आमदार निवडून येणार नाही, असा दावा शिवसेनेच्या नेत्यांकडून केला जात होता. पण हा दावा आता फोल होताना दिसत आहे. (Maharashtra Vidhan Sabha Election 2024)
त्यावेळी झालेल्या विधानसभेच्या अधिवेशनात मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आपले पहिले भाषण केले होते. आमचा 50 मधला एकही आमदार आम्ही पडू देणार नाही. तसेच भाजपचेही 115 आमदार मिळून आम्ही 200 चा आकडा पार करू. हा सभागृहात शब्द आहे आणि तसे नाही केले, तर गावाला शेती करायला जाईन, असे एकनाथ शिंदे म्हणाले होते. आता शिंदेंच्या शिवसेनेने 55 जागांवर आघाडी घेत आपला स्ट्राईक रेट वाढविला आहे. तसेच महायुतीचा आकडा 220 पेक्षा अधिक होताना दिसत आहे. (Maharashtra Vidhan Sabha Election 2024)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community