Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उपमुख्यमंत्री अजित पवारांसह राज्यातील अनेक नेत्यांनी बजावला मतदानाचा हक्क

25
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उपमुख्यमंत्री अजित पवारांसह राज्यातील अनेक नेत्यांनी बजावला मतदानाचा हक्क
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उपमुख्यमंत्री अजित पवारांसह राज्यातील अनेक नेत्यांनी बजावला मतदानाचा हक्क

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राज्यभरात मतदान सुरु आहे. सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. राज्यातील अनेक नेत्यांनी सकाळी लवकर मतदान केले आहे. बारामती मतदारसंघात राज्याचे उपमु्ख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनीही पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्यासह मतदानाचा हक्क बजावला आहे. अजित पवार यांनी आज आपल्या काटेवाडी या गावी मतदान केले. (Maharashtra Vidhan Sabha Election 2024)

(हेही वाचा – Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उपमुख्यमंत्री अजित पवारांसह राज्यातील अनेक नेत्यांनी बजावला मतदानाचा हक्क)

योग्य उमेदवारांना विजयी करावे – अजित पवार यांचे आवाहन

मतदानाचा हक्क बजावल्यानंतर अजित पवार म्हणाले की, “महाराष्ट्रातील २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये आज मतदान होत असताना हे राज्य कोणाच्या हातात द्यायचे, याबाबतचा निर्णय जनतेने घ्यायचा आहे. योग्य उमेदवारांना जनतेने ज्या त्या मतदारसंघात विजयी करावे आणि महाराष्ट्राची घोडदौड सातत्याने पुढे राहील, असा प्रयत्न करावा,” असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे.

बारामती मतदारसंघात अजित पवार यांच्या विरोधात त्यांचा पुतण्या युगेंद्र पवार (Yugendra Pawar) हे शरद पवार गटाकडून उभे आहेत. युगेंद्र पवार, खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनीही मतदान केले आहे. राज्यातील अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या आहेत.

‘या’ नेत्यांनी सकाळी लवकर केले मतदान

वांद्रे मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आशिष शेलार, भायखळा मतदारसंघाच्या उमेदवार यामिनी जाधव, माहिम मतदारसंघाचे मनसे उमेदवार अमित ठाकरे, उबाठा गटाचे उमेदवार महेश सावंत यांनीही मतदानाचा हक्क बजावला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.