विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर राज्यात सर्वंच राजकीय पक्षांची विविध ठिकाणी जाहीर सभा होत आहेत. भाजपाने त्यांचे महाराष्ट्रातील व देशातील स्टार प्रचारक या निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) हे राज्यातील प्रचारसभेतून ‘बटेंगे तो कटेंगे’ असा नारा देत असून मतदारांनी काय केलं पाहीजे, ते सांगत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी हा नारा समाजमाध्यमांवर शेअर केला आहे. त्यापाठोपाठ पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी ‘एक है तो सेफ है’ असा नारा दिला आहे. मात्र, महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने मात्र या घोषणांपासून आंतर राखलं आहे. (Maharashtra Vidhan Sabha Election 2024)
(हेही वाचा-मविआचा जाहीरनामा नव्हे थापानामा; Eknath Shinde यांची टीका)
अजित पवारांनी (Ajit Pawar) योगी आदित्यनाथ यांच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ या नाऱ्यावर टीका केली होती. ते म्हणाले, “बाहेरच्या राज्यातील नेते येऊन काहीही वक्तव्ये करत आहेत. परंतु, महाराष्ट्राने नेहमीच जातीय सलोखा जपलेला आहे.” योगी आदित्यनाथांचं हे वक्तव्य आणि त्यावरील अजित पवारांच्या प्रतिक्रियेमुळे महायुतीमध्ये तेढ निर्माण झाली का? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. (Maharashtra Vidhan Sabha Election 2024)
विशेष म्हणजे योगी आदित्यनाथ, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) व पंतप्रधान नरेंद्र मोदी अजित पवारांच्या पक्षाच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेताना दिसत नाहीत. राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचारसंभांमध्ये हे तिघेही दिसत नाहीत. पक्षाने देखील अशा कुठल्याही सभेचं आयोजन केलेलं नाही. यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. (Maharashtra Vidhan Sabha Election 2024)
(हेही वाचा-Chhatrapati Shivaji Maharaj : शिवरायांचं मंदिर लोकांच्या मनात उभारायला हवं!)
मोदी-शाहांच्या सभा न घेण्यावरून प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधिंनी प्रश्न विचारल्यानंतर अजित पवार म्हणाले, “मी बारामती मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सभा घेण्याची विनंती केली नाही. कारण, येथील लढाई ही कौटुंबिक आहे”. या मतदारसंघात अजित पवारांविरोधात त्यांचाच पुतण्या युगेंद्र पवार यांनी आव्हान निर्माण केलं आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या तिकीटावर ही निवडणूक लढवत आहेत. (Maharashtra Vidhan Sabha Election 2024)
अजित पवार म्हणाले, “महाराष्ट्राची तुलना इतर राज्यांशी करणं चुकीचं ठरेल. महाराष्ट्रातील जनतेने आजवर पुरोगामीपण जपलं आहे. बाहेरच्या राज्यातील नेत्यांनी इथे येऊन वेगळी वक्तव्ये करू नयेत. महाराष्ट्र हा शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांना मानणारा आहे. बाहेरच्या राज्यातील नेते जे विचार मांडत आहेत, ते विचार महाराष्ट्राने कधीच मान्य केलेले नाहीत.” हे वक्तव्य करत असताना अजित पवारांनी योगी आदित्यनाथांचा उल्लेख करणं टाळलं. (Maharashtra Vidhan Sabha Election 2024)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community