राज्यातील 288 विधानसभा (Maharashtra VidhanSabha Election 2024) मतदारसंघासाठी आज (बुधवार 20 नोव्हेंबर) मतदान होणार आहे. मतदान सुरळीत पार पडावं म्हणून निवडणूक आयोग (Election Commission) आणि पोलीस यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. सकाळपासूनच मतदानाला सुरूवात झाली आहे. राज्यात एकूण 4 हजार 140 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. (Maharashtra VidhanSabha Election 2024)
(हेही वाचा-Assembly Election 2024: महाराष्ट्र, झारखंडमधील मतदान सुरु, प्रशासन सज्ज)
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात एकूण 25 हजार 696 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सर्व यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. राज्यात महायुतीचे (Mahayuti) सरकार येणार की महाविकास आघाडीचे (MVA) की इतरांच्या मदतीने कुणाचे सरकार येणार हे चित्र लवकरच स्पष्ट होईल. या निवडणुकीत महायुती-महाविकास आघाडीच्या प्रमुख 6 पक्षांमध्ये थेट टक्कर आहे. (Maharashtra VidhanSabha Election 2024)
(हेही वाचा-Winter session 2024: संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी सरकारने बोलावली बैठक; हे आहे कारण )
बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार (AJit Pawar) , सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी मतदानाचा हक्क बजावला. बारामतीमधील जनता यावेळी मला मोठ्या मताधिक्याने निवडून देईल, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला. खुल्या वातावरणात सर्वांनी मतदान करावं. कोण चांगल्या प्रकारे काम करू शकेल, नेतृत्व करू शकेल याचा मनाापासून विचार करावा. जनतेने कोणाच्याही दबावाला बळी पडू नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मतदारांना केलं. (Maharashtra VidhanSabha Election 2024)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community