राज्यात विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) महायुतीने (Mahayuti) दणदणीत विजय मिळवत, महाविकास आघाडीचा सुफडा साफ केला. महायुतीतील तिन्ही पक्षांनी एकत्रितपणे 230 जागा जिंकल्या आहेत. तर महाविकास आघाडीला (MVA) 50 जागांचाही आकडा गाठता आलेला नाही. राज्यात 133 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवत भाजपच मोठा भाऊ ठरला आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची शिवसेना 57 आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीला 41 जागांवर यश मिळाल आहे. (Maharashtra Vidhan Sabha Election 2024)
लोकसभेत बसलेल्या फटक्यानंतर महायुतीने प्रचारात कसर सोडली नाही. महायुतीचे प्रचारसभेतील अनेक मुद्दे गाजले. लाडकी बहिण योजना हिट ठरली. अनेक बड्या नेत्यांना या निवडणुकीत पराभवाचा सामनाही करावा लागला. तर काही नेत्यांना अगदी काठावर विजय मिळवण्यात यश आल्याचं पाहायला मिळालं. ‘एक हैं तो सेफ हैं’ ही सर्वाधिक चर्चेत आलेली भाजपची घोषणा नरेंद्र मोदी यांनी दिली होती. त्यानंतर बटेंगे तो कटेंगे हा योगी आदित्यनाथ यांचा नारा महायुतीच्या विजयासाठी हुकमी एक्का ठरला.(Maharashtra Vidhan Sabha Election 2024)
(हेही वाचा-Maharashtra Vidhan Sabha Election 2024: सरकार स्थापनेची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या एका क्लिकवर!)
मनोज जरांगेंचा आरक्षण मुद्दा चालला नाही. कारण बहुतांश मराठा हे कुणबी प्रमाणपत्र धारण करणारेच आहेत. त्यामुळे आघाडीला अपयश आले. महिलांनी केलेल्या भरघोस मतदानामुळेच महायुतीला इतकी मते मिळू शकली. त्यात काँग्रेसलाही मोठा फटका बसला आहे.(Maharashtra Vidhan Sabha Election 2024)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community