महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) काल (२३ नोव्हें.) समोर आला आहे. यात महायुतीने अभूतपूर्व यश मिळवलं. एकूण 288 जागांसाठी मतदान झाले. यापैकी तब्बल 132 जागांवर भाजपाने दणदणीत विजय नोंदवला आहे. या जागांसह भाजपा (BJP) हा राज्यातील सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. सलग तिसऱ्या निवडणुकीत भाजपाने 100 पेक्षा अधिक जागा मिळवल्या आहेत. या निवडणुकीत भाजपनंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा पक्ष दुसरा सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. या पक्षाला एकूण 57 जागा मिळाल्या आहेत. तर अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पक्षाला एकूण 41 जागांवर विजय मिळाला आहे. (Maharashtra Vidhan Sabha Election 2024)
(हेही वाचा-Maharashtra Vidhan Sabha Election 2024: राज्यात महायुतीचा डंका; विजया मागची नेमकी कारणे काय ?)
त्यानंतर आता सत्तास्थापनेच्या हालचालांना वेग आला आहे. शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची आज महत्वपूर्ण बैठक होणार आहे. मुख्यमंत्रिपदापासून मंत्रिमंडळाच्या फॉर्म्युलावर देखील महायुतीमध्ये चर्चा सुरु झाली आहे. महायुतीमध्ये मंत्रिमंडळाचा अंदाजित फॉर्म्युला 21, 12, 10 असा असू शकतो. यात भाजपला सर्वाधिक 21 मंत्रिपदे, त्यानंतर शिवसेनेला 12 आणि राष्ट्रवादीला 10 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे. (Maharashtra Vidhan Sabha Election 2024)
राज्यातील विधानसभेचा कार्यकाळ 26 तारखेला संपत असल्यामुळे एक दिवस आधीच महायुती सरकार स्थापन करणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे, मुख्यमंत्री कोण होणार हे लवकरच स्पष्ट होईल. (Maharashtra Vidhan Sabha Election 2024)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community