यंदा अजित पवार (Ajit Pawar) विरूद्ध शरद पवारांचे नातू युगेंद्र पवार (Yugendra Pawar) हे विधानसभेच्या (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) रिंगणात आहे. त्यामुळे काका विरूद्ध पुतण्या अशी लढत विधानसभेच्या निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) बारामतीत पाहायला मिळणार आहे. मतदानाला अवघे २४ तास उरलेले असतानाच अनेक घडामोडी समोर येत आहेत. बारामतीत पोलिसांनी सर्च मोहीम राबवली असल्याची माहिती मिळते आहे.
दरम्यान १८ नोव्हेंबरच्या रात्री श्रीनिवास पवार (Srinivas Pawar) यंच्या शरयू मोटर्समध्ये (Sharyu Motors) पोलिसांनी सर्च ऑपरेशन राबवले. रात्री पोलिसांनी या ठिकाणी चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे सर्च ऑपरेशन राबवण्यात आल्याचे समजते. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. (Maharashtra Vidhan Sabha Election 2024)
(हेही वाचा-Uddhav Thackeray: “खरा गद्दार तर…” राज ठाकरेंच्या टीकेवर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया!)
हे सर्च ऑपरेशन का राबवण्यात आले ? त्याचा काय उद्देश होता ? त्यातून पोलिसांच्या हाती काय लागले ? याची माहिती पोलिसांनी दिलेली नाही. या संपूर्ण प्रकारावर आता युगेंद्र पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरयू मोटर्स मध्ये चौकशी केली असता काही सापडलं नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. (Maharashtra Vidhan Sabha Election 2024)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community