Maharashtra Vidhansabha Election 2024: ‘Vote Jihad’ प्रकरणी पोलिसांची धडक कारवाई; दोघांच्या आवळल्या मुसक्या

116
Maharashtra Vidhansabha Election 2024: ‘Vote Jihad’ प्रकरणी पोलिसांची धडक कारवाई; दोघांच्या आवळल्या मुसक्या
Maharashtra Vidhansabha Election 2024: ‘Vote Jihad’ प्रकरणी पोलिसांची धडक कारवाई; दोघांच्या आवळल्या मुसक्या

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी (Maharashtra Vidhansabha Election 2024) भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी मालेगाव येथील बँकेत बेहिशोबी पैसा हवालामार्फत जमा झाल्याचा आरोप केला होता. त्यांनी 125 कोटी रुपये विविध बँक खात्यात जमा झाल्याचे आणि तो पैसा विविध खात्यात हस्तांतरीत केल्याचा आणि रोख रक्कम वाटल्याचा आरोप केला होता. हा पैसा वोट जिहाद (Vote Jihad) असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. तर यापूर्वी मालेगावमध्ये 250 कोटी रुपयांची बेहिशोबी रक्कम आल्याचे समोर आले होते. हवाला रॅकेटद्वारे ही रक्कम येत असल्याचे समोर आले होते. (Maharashtra Vidhansabha Election 2024)

(हेही वाचा-Manipur मध्ये जिरिबाम हल्ल्यानंतर CAPF च्या 20 तुकड्या तैनात; इम्फाळ खोऱ्यातील 5 जिल्हे बंद)

या पार्श्वभुमीवर आता पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या प्रकरणातील मास्टरमाईंड सिराज मोहम्मद याला आणि नाशिक मर्चेंट कोऑपरेटिव्ह बँकेचे शाखा व्यवस्थापक दीपक निकम यांना अटक करण्यात आली आहे. किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीवर वोट जिहादचा आरोप केला आहे. वोट जिहादच्या (Vote Jihad) माध्यमातून कोट्यवधीचा निधी देण्यात आल्याचा त्यांनी आरोप केला आहे. (Maharashtra Vidhansabha Election 2024)

(हेही वाचा-Central Railway विस्कळीत; प्रवाशांचा मोठा खोळंबा)

बुधवारी (१३ नोव्हें.) कोकणात पोलिसांनी बांगलादेशी घुसखोरांना अटक केली होती. सोमय्या यांनी निवडणूक आयोग, ईडी, सीबीआय सीबीडीटी, आरबीआयसह अनेक ठिकाणी लिखित तक्रार दाखल केली होती. याप्रकरणाच्या सखोल चौकशीची त्यांनी मागणी केली होती. याप्रकरणात मालेगावच्या छावणी पोलीस ठाण्यात 7 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही रक्कम परदेशातून आल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. मालेगावातील 17 गरीब लोकांच्या नावे खाते उघडल्याचे समोर आले आहे. (Maharashtra Vidhansabha Election 2024)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.