Maharashtra Vidhansabha Election 2024: महायुतीची सत्ता आल्यास राज्यात MP पॅटर्न राबवणार? Vinod Tawde यांचे सूचक विधान

92
Maharashtra Vidhansabha Election 2024: महायुतीची सत्ता आल्यास राज्यात MP पॅटर्न राबवणार? Vinod Tawde यांचे सूचक विधान
Maharashtra Vidhansabha Election 2024: महायुतीची सत्ता आल्यास राज्यात MP पॅटर्न राबवणार? Vinod Tawde यांचे सूचक विधान

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर (Maharashtra Vidhansabha Election 2024) राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत अनेक नावं चर्चेत आहेत. या विषयावर आता भाजपचे (BJP) राष्ट्रीय नेते विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी सूचक विधान केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय व सामाजिक परिस्थिती लक्षात घेऊन भाजपचे केंद्रीय नेतृत्व एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्याशी चर्चा करून महायुतीच्या मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याचा निर्णय घेतील. या प्रकरणी राजस्थान व मध्य प्रदेशासारखाच महाराष्ट्रातही प्रयोग होऊ शकतो. म्हणजे मुख्यमंत्रीपदासाठी अचानक एखाद्या नव्या उमेदवाराचे नाव समोर येऊ शकते, असे विधान विनोद तावडे यांनी केलं. (Maharashtra Vidhansabha Election 2024)

(हेही वाचा-“आमच्यासाठी उद्धव ठाकरेंचा पायगुण इतका चांगला आहे की…”Nitesh Rane असं का म्हणाले?)

विनोद तावडे एका वृत्तपत्राशी बोलताना म्हणाले, “मुख्यमंत्रीपदावर आताच काही बोलणे चुकीचे आहे. भाजपने अनेक ठिकाणी पुन्हा त्याच नावांना संधी दिली आहे. त्यामुळे केंद्रीय नेतृत्व काय ठरवेल आणि नेमके आकड्यांचे गणित कसे ठरते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. आम्ही कुणाच्या वाट्याला कधी जात नाही नाही पण जर कुणी आमच्या वाट्याला गेले तर त्याला सोडत नाही. 2019 मध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी गद्दारी केली नसती तर आम्हाला असे राजकारण करण्याची गरज पडली नसती.” (Maharashtra Vidhansabha Election 2024)

(हेही वाचा-Maharashtra Vidhansabha Election 2024: ‘Vote Jihad’ प्रकरणी पोलिसांची धडक कारवाई; दोघांच्या आवळल्या मुसक्या)

“2014 मध्ये आमचे 124 आमदार निवडून आले होते. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी विरोधात बसण्याची भूमिका घेतली. पवारांनी आम्हाला पाठिंबा दिला. तेव्हा यांना तो पाठिंबा चालला. मग आता का नाही ? 2022 मध्ये एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजपचे सरकार आले पण बहुमतापेक्षा केवळ 4 आमदार जास्त होते. सरकार भक्कम असले तर लोकहिताचे निर्णय घेता येतात म्हणून अजित पवार (Ajit Pawar) यांना सोबत घेतले तेव्हा आमचे संख्याबळ 190 पेक्षा अधिक झाले.” (Maharashtra Vidhansabha Election 2024)

(हेही वाचा-Amit Shah: CISF च्या पहिल्या महिला बटालियनला केंद्राची मान्यता; ‘या’ सुरक्षा सांभाळणार)

“माहीमबद्दल बोलयचे असेल तर विधानसभा निवडणूक जवळ आल्यानंतर असे लक्षात आले की, जर सदा सरवणकर निवडणुकीच्या रिंगणात उतरले नाहीत तर ठाकरे गटाचा उमेदवार निवडून येण्याची शक्यता होती. त्यानंतर आता आपल्या सर्वांसमोर जे चित्र आहे, ते स्पष्ट आहे.” असंही विनोद तावडे माहीम मतदारसंघाबद्दल म्हणाले. (Maharashtra Vidhansabha Election 2024)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.