Maharashtra VidhanSabha session: विधानसभेत ८ आमदारांचे राजीनामे मंजूर; ‘ते’ आमदार कोण?

235
Maharashtra VidhanSabha session: विधानसभेत ८ आमदारांचे राजीनामे मंजूर; 'ते' आमदार कोण?
Maharashtra VidhanSabha session: विधानसभेत ८ आमदारांचे राजीनामे मंजूर; 'ते' आमदार कोण?

विधानसभेचे (Maharashtra VidhanSabha session) पावसाळी अधिवेश गुरूवारपासून सुरू झाले आहे. या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी 8 आमदारांचे राजीनामे (Resignations of MLA) मंजूर करत असल्याची घोषणा विधानसभेत केली. हे आमदार कोण याची माहितीही त्यांनी विधानसभेला दिली. यात 4 आमदार हे काँग्रेसचे आहेत. तर दोन आमदार हे शिवसेनेचे आहेत. शरद पवार गटाचा एक आमदार आहे. तर राजू पारवे यांनी काँग्रेस सोडल्यानंतर राजीनामा दिला होता. (Maharashtra VidhanSabha session)

राजीनामा मंजूर

आमदार असलेले सात जण लोकसभेवर निवडून गेले आहेत. तर लोकसभा लढवण्यासाठी राजू पारवे यांनी आधीच राजीनामा दिला होता. पण त्यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. काँग्रेसच्या वर्षा गायकवाड, प्रणिती शिंदे, बळवंत वानखडे आणि प्रतिभा धानोरकर यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. वर्षा गायकवाड या उत्तर मध्य मुंबई लोकसभेतून तर प्रणिती शिंदे सोलापूर, बळवंत वानखडे अमरावती आणि प्रतिभा धानोरकर या चंद्रपूर लोकसभेतून विजयी झाल्या आहेत. त्यामुळे त्यांनी विधानसभेचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस प्रमाणे निलेश लंके यांचाही राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. ते अहमदनगर लोकसभा मतदार संघातून विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपाच्या सुजय विखे पाटील यांचा पराभव केला. त्यांनीही आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. (Maharashtra VidhanSabha session)

(हेही वाचा –महाविकास आघाडी तुटेल पण मुख्यमंत्री पदाचा चेहरा समोर येणार नाही; Sanjay Shirsat यांची टीका)

त्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे नेते संदिपान भूमरे हे सरकारमध्ये मंत्री आहेत. पण त्यांनी छ. संभाजीनगर लोकसभेतून विजय मिळवला आहे. त्यांनी ठाकरे गटाच्या चंद्रकांत खैरेंचा पराभव केला. त्यामुळे त्यांनीही आमदार पदाचा राजीनामा दिला आहे. तर रविंद्र वायकर यांनीही उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघातून निसटता विजय मिळवला. त्यांनी ठाकरे गटाच्या अमोल किर्तिकर यांचा पराभव केला. (Maharashtra VidhanSabha session)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.