गेल्या काही महिन्यांपासून मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी बांगलादेशी (Bangladeshi) अन् रोहिंग्याविरुद्ध (Rohingya) चळवळ सुरू केली आहे. महाराष्ट्र बांगलादेशी अन् रोहिंग्यामुक्त करायचा आहे, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे. तर अवैधरित्या राहणारे काही लोकं अतिरेकी कारवायांना मदत करतात असेही त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे. (Nitesh Rane)
हेही वाचा-Chhatrapati Sambhajinagar : अचानक शाळेत घुसला रेडा अन् … ; 13 विद्यार्थी जखमी, एक गंभीर
पुढे बोलताना नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले की, “ही घाण आम्हाला राज्यात नको आहे, कारण ते जिथे जातात तो भाग घाण ही लोकं करतात. काही ठिकाणी मतदानामध्येदेखील ही लोकं सहभागी होत आहे. पण आमचे सरकार ही सर्व घाण साफ करण्याकडे लक्ष देत आहे.”
महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळात एकही बांगलादेशी आणि रोहिंग्या दिसणार नाही, असा विश्वास राणेंनी व्यक्त केला आहे. देशातील बांगलादेशी हिंदूंच्या सणांवर दगडफेक करतात. जर या विरोधात आवाज उठवला गेला तर तो उठवल्याबद्दल गुन्हा दाखल झाला तर मी त्याला सामोरे जाण्यास तयार असल्याचे राणे (Nitesh Rane) यांनी म्हटले आहे.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community