जम्मू आणि काश्मीरमधून (Jammu-Kashmir) ३७० कलम हटवल्यानंतर तिथे महाराष्ट्र भवन बांधण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी जम्मू आणि काश्मीर सरकारने श्रीनगरच्या विमानतळानजीकच बडगाम येथे अडीच एकर जागा दिली आहे. मात्र आता जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी महाराष्ट्र भवन बांधण्याला विरोध केला आहे. जरी येथे महाराष्ट्र भवन बांधले तरी आमचे सरकार आल्यावर आम्ही ते भवन बंद करू, असा इशारा त्यांनी दिला आहे.
(हेही वाचा Madha : माढ्यातील उमेदवारीच्या तिढ्याला शरद पवारांची रसद ? मोहिते पाटलांची प्रचाराला सुरुवात)
काय म्हणाले ओमर अब्दुल्ला?
येत्या ऑक्टोबर महिन्यात आमचे सरकार राज्यात आल्यानंतर हे भवन बंद करू अशी मुक्ताफळे त्यांनी उधळली. कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मिरात (Jammu-Kashmir) विधानसभा निवडणुका जिंकण्याचा निर्धार ओमर अब्दुल्ला यांनी केला. त्यावेळी काश्मीर खोऱ्यातील बडगाम येथे बांधण्यात येणाऱ्या महाराष्ट्र भवनवर त्यांनी टीका केली. या महाराष्ट्र भवनामुळे स्थानिक हॉटेल व्यावसायिकांचा रोजगार हिसकावला जाईल. सध्या काश्मिरात (Jammu-Kashmir) मोठमोठ्या इमारती बांधल्या जात आहेत. विशेषत: पर्यटकांना राहण्यासाठी खोल्या बनवल्या जात आहेत. महाराष्ट्र भवनाचा वापर पर्यटकांसाठी केला जाणार आहे. हे तेच पर्यटक असतील जे सध्या आमच्या हॉटेल्समध्ये राहतात. स्थानिक हॉटेल व्यावसायिकांची उपजीविका तुम्ही हिसकावून घेत आहात. आमचे सरकार येताच आम्ही भवनाकडे बघू असा इशारा ओमर अब्दुल्ला यांनी जम्मू काश्मीर प्रशासनाला दिला आहे. काश्मीर खोऱ्यात इतर राज्याचे भवन असलेले महाराष्ट्र पहिले राज्य असणार आहे.
Join Our WhatsApp Community