धक्कादायक! हिवाळी अधिवेशनातील ३२ जणांना कोरोनाची लागण

94

भाजप आमदार समीर मेघे यांना कोरोनाची लागण झाल्यावर आता धाबे दणाणले आहेत. विशेष म्हणजे समीर मेघे राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सहभागी झाले होते. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. मेघे कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून शनिवारी, 25 डिसेंबर रोजी 1500 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी तब्बल 32 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये मात्र कोणत्याही लोकप्रतिनिधीचा समावेश नाही.

विधीमंडळ कर्मचारी, पोलिस आणि पत्रकारांना बाधा

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला 22 डिसेंबर रोजी सुरुवात झाली होती. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सर्व आमदारांसह कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी केली गेली होती. सर्व गोष्टींची खबरदारी घेण्यात आली होती. पण तरीही अधिवेशनात अखेर कोरोनाचा शिरकाव झाला आहे. अधिवेशनासाठी काम करणारे पोलिस कर्मचारी, काही मंत्रालय कर्मचारी तसेच विधानभवनातील कर्मचाऱ्यांचा 32 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या कोरोनाबाधितांमध्ये समावेश आहे. खरंतर हिवाळी अधिवेशन दोन आठवड्यांमध्ये होते. पहिल्या आठवड्यात तीन दिवस आणि येणाऱ्या आठवड्यात दोन दिवस, असा कालावधी अधिवेशनासाठी निश्चित करण्यात आलेला होता. दोन्ही आठवड्याच्या सुरुवातीला कोरोनाची चाचणी बंधनकारक आहे. त्याच पार्श्वभूमीवर अधिवेशनाला येणारे सर्व आमदार, मंत्री, सरकारी कर्मचारी, पोलिस, पोलिस अधिकारी आणि पत्रकार या सर्वांची कोरोना चाचणी दोन्ही आठवड्यात केली गेली. दोन दिवसात या चाचण्या घेण्यात आल्या. त्यामध्ये 32 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. यामध्ये काही पोलिस, सरकारी कर्मचारी आणि काही पत्रकारांचा समावेश आहे. पण एकाही आमदारांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती सध्यातरी समोर आलेली नाही. रात्री उशिरापर्यंत आणखी अनेकजणांचे अहवाल येणार आहेत.

(हेही वाचा नवाब मलिकांकडून मुस्लिमांची दिशाभूल! काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.