चंद्रकांत पाटलांसह राणेंवर कारवाईची शक्यता, काय आहे कारण?

119

दिशा सालियन मृत्यूप्रकरणी पुराव्याशिवाय विधाने केल्याप्रकरणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि आमदार नितेश राणे यांच्या विरोधात राज्य महिला आयोग सक्रिय झाला आहे. या प्रकरणी महिला आयोगाने या दोघांवर तत्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे या दोघांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

आयोगाच्या निर्देशानुसार पोलिसांनी दिला अहवाल

आयोगाने मालवणी पोलिसांना २४ तासांत याबाबतच्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याची सूचना केली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दिशा सॅलियन मृत्यू प्रकरणी अहवाल सादर करण्यास सांगितले होते. त्यानुसार पोलिसांनी आयोगाला दिलेल्या अहवालात दिशावर बलात्कार झाला नव्हता किंवा ती गरोदर नव्हती असे स्पष्ट करण्यात आले आहे. मृत्यूनंतर दिशाची सुरू असलेली बदनामी थांबवावी. दिशाच्या मृत्यूबद्दल खोटी व बदनामीकारक माहिती दिल्याबद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे व संबंधितांवर कारवाईची मागणी दिशाच्या आई-वडिलांनी राज्य महिला आयोगाकडे केली आहे. या पार्श्वभूमीवर नारायण राणे आणि नितेश राणे यांच्यासह चंद्रकांत पाटील यांच्यावर तात्काळ फौजदारी कारवाई करून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल राज्य महिला आयोगास २४ तासांच्या आत सादर करण्याचे निर्देश मालवणी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना दिले आहेत.

(हेही वाचा नवाब मलिकांचे मौन ठरणार मुलासाठी अडचणीचे…)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.