देशाचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांचा वारसा निश्चित झाला आहे. न्यायमूर्ती खन्ना निवृत्त झाल्यानंतर पुढील सरन्यायाधीश कोण होणार त्याचे नाव निश्चित झाले आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध विधिज्ञ आणि आंबेडकरी चळवळीचा वारसा लाभलेले न्यायमूर्ती भूषण गवई (Bhushan Gavai) देशाचे सरन्यायाधीश होणार आहेत.
हेही वाचा-कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या Vishal Gawali ची तळोजा कारागृहात आत्महत्या
ते 52 वे सरन्यायाधीश म्हणून 14 मे रोजी शपथ घेणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांना सरन्यायाधीश पदाची शपथ देतील. भूषण गवई हे भारतीय रिपब्लिकन पक्षाचे दिवंगत नेते, माजी आमदार, खासदास आणि बिहार, सिक्कीम व केरळ राज्यांचे राज्यपाल राहिलेल्या रा.सु. गवई आणि कमलाताई गवई यांचे पुत्र आहेत. (Bhushan Gavai)
हेही वाचा- Myanmar Earthquake : म्यानमार पुन्हा एकदा जोरदार भूकंपाने हादरलं !
न्यायमूर्ती भूषण गवई यांचा जन्म अमरावती जिल्ह्यात 24 नोव्हेंबर 1960 रोजी झाला. मुंबईतून कायद्याची पदवी घेतल्यानंतर त्यांनी 1985 मध्ये वकिलीला सुरुवात केली. काही काळ त्यांनी मुंबई आणि अमरावतीमध्ये काम केले. त्यांनी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दिवंगत बॅरिस्टर राजा एस. भोसले यांच्यासोबत काम केले. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात ते न्यायाधीश झाले. काही काळानंतर त्यांना बढती मिळाली. ते 24 मे 2019 रोजी सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश झाले. आता 14 मे 2025 रोजी ते सरन्यायाधीश पदाची शपथ घेणार आहेत. त्यांना सरन्यायाधीश म्हणून सहा महिन्यांचा काळ मिळणार आहे. ते 23 नोव्हेंबर 2025 रोजी निवृत्त होतील. (Bhushan Gavai)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community