महाविकास आघाडीचा ‘उद्योग’ पिछाडीवर!

राज्याची उत्पादन क्षमता वाढावी व उद्योगाचे विकेंद्रीकरण व्हावे याकरिता केंद्र सरकारकडून सुरु करण्यात आलेल्या 'एक जिल्हा एक उत्पादन' यातही महाराष्ट्र दुर्दैवाने पिछाडीवर पडला आहे, असे भातखळकर म्हणाले.

137

देशाच्या एकूण निर्यातीत पूर्वी २४ टक्के असणारा महाराष्ट्राचा वाटा आता महाविकास आघाडी सरकारच्या २०२०-२१ या वर्षी तब्बल ४ टक्क्यांनी कमी झाला आहे. कोविडच्या काळातही संपूर्ण देशांची निर्यात वाढत असताना महाराष्ट्राचा वाटा मात्र कमी होणे हे दुर्दैवी असून मुख्यमंत्र्यांच्या अकार्यक्षमतेचा व राज्यातील उद्योग विरोधी वातावरणाचा ढळढळीत पुरावा आहे, अशी टीका भाजपा मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

उद्योगांच्या विकेंद्रीकरणातही महाराष्ट्र मागे 

नीती आयोगाकडून जाहीर केलेल्या एक्सपोर्ट प्रीपेडनेस इंडेक्समध्ये सुद्धा महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. राज्याची उत्पादन क्षमता वाढावी व उद्योगाचे विकेंद्रीकरण व्हावे याकरिता केंद्र सरकारकडून सुरु करण्यात आलेल्या ‘एक जिल्हा एक उत्पादन’ यातही महाराष्ट्र दुर्दैवाने पिछाडीवर पडला आहे. राज्यातील धुळे, जळगाव, अमरावती, अकोला, गडचिरोली व हिंगोली यासारख्या जिल्ह्यामध्ये उत्पादन वाढीसाठी कोणतेही विशेष प्रयत्न राज्य सरकारकडून केले जात नाहीत, हेही दिसून आले आहे. देशातील अनेक राज्यांनी या योजनेसाठी विशेष यंत्रणा व वेबसाईट सुरु केलेली असताना ठाकरे सरकार या विषयात सुस्त बसले आहे. जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्ट महिन्याचे जीएसटी संकलन ३,७२८ कोटी रुपयांनी कमी झाले असताना आणि टेस्ला सारख्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर गेल्या असतानाच आता निर्यातीत सुद्धा महाराष्ट्र पिछाडीवर गेल्याची आकडेवारी समोर येणे ही राज्यासाठी चिंतेची बाब आहे, किमान आता तरी उद्योग विभागाने ‘भूषणावह उद्योग’ सोडून या क्षेत्राच्या वाढीसाठी उपाययोजना कराव्या, असेही भातखळकर म्हणाले.

(हेही हेही वाचा : स्वातंत्र्यवीर सावरकर नाही, नेहरुच होते खरे माफीवीर! भातखळकरांचा हल्लाबोल)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.