गांधीही ब्रिटिशांचे नोकर होण्यास तयार होते का, फडणवीसांनी राहुल गांधींना पुराव्यानिशी विचारला प्रश्न

88

भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात येताच सुरुवातीचे तीन दिवस प्रसिद्धी मिळत नाही हे दिसल्यावर राहुल गांधी यांनी सवंग लोकप्रसिद्धीसाठी वीर सावरकर यांनी ब्रिटिशांना अंदमानातून जे आवेदन पत्र लिहिले त्यातील शेवटच्या दोन ओळींचा सोयीनुसार अर्थ काढत ‘सावरकर ब्रिटिशांना ते त्यांचा नोकर होण्यास तयार आहेत, अशी इच्छा व्यक्त केली होती’, असे म्हणाले आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ते पत्र वाचण्यास सांगितले. त्यावर दुसऱ्याच दिवशी १८ नोव्हेंबर रोजी फडणवीस यांनी गांधींनी ब्रिटिशांना लिहिलेले पत्र ट्विट केले, ज्यात त्यांनीही सावरकर यांनी वापरलेलेच शब्द होते, त्यावरून गांधीही ब्रिटिशांचे नोकर होण्यास तयार होते का, असा खडा सवाल फडणवीसांनी राहुल गांधींना पुराव्यानिशी विचारला.

काय म्हणाले फडणवीस?

गांधी यांचे पत्र ट्विट करत फडणवीस म्हणाले, राहुल गांधी, काल तुम्ही मला एका पत्राच्या शेवटच्या ओळी वाचायला सांगितल्या होत्या. चला, आज मी तुम्हाला काही कागदपत्रे वाचून दाखवतो. आमच्या आदरणीय महात्मा गांधींचे हे पत्र तुम्ही वाचले आहे का?, त्यात त्याच शेवटच्या ओळी आहेत ज्या तुम्ही वाचायला हव्या होत्या? याचबरोबर शरद पवारांचे एक भाषण फडणवीस यांनी ट्विट केले आहे. तसेच इंदिरा गांधी यांचे एक पत्रही फडणवीस यांनी ट्विट केले आहे.

(हेही वाचा शरद पवार म्हणतात, सावरकरांप्रति अंतःकरणामध्ये निश्चितपणे आदराच्या भावना आहेत!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.