सध्या काँग्रेसचे नेते राहुल गांधी अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान राहुल गांधी अशी काहीतरी विधान करत आहेत, ज्यामुळे ते चांगलेच चर्चेत राहत आहेत. तसेच त्यांना विधानाविरोधातील टीकांना सामना करावा लागत आहे. अशातच पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी बरळून भारतीय स्वातंत्र्यलढ्याविषयी मुक्ताफळे उधळली आहेत. भारतीय स्वातंत्र्यलढा दक्षिण अफ्रिकेत सुरू झाला. पंडित नेहरू, सरदार पटेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सुभाषचंद्र बोस यांच्यासह स्वातंत्र्यलढ्यांशी संबंधित सर्व प्रमुख नेते एनआरआय म्हणजे अनिवासी भारती होते, असे राहुल गांधींनी न्यूयॉर्कमध्ये सांगून सर्वांना आश्चर्यचकीत केले आहे. राहुल गांधींच्या या विधानामुळे सर्व भारतीयांवर तोंडात बोट घालून चकित व्हायची वेळ आली आहे.
राहुल गांधी अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना ते सोमवारी वॉशिंग्टन आणि सॅन फ्रान्सिस्कोचा प्रवास करून न्यूयॉर्कला पोहोचले. त्यानंतर मॅनहॅटनमधील जेविट्स सेंटर तेथे राहुल गांधी भारतीय वंशांच्या लोकांना संबोधित करत होते, त्यावेळेस त्यांनी हे वादग्रस्त विधान केले.
(हेही वाचा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महत्त्वाचे ट्वीट; आगामी निवडणुकांबाबत भाजपसोबत…)
राहुल गांधी नक्की काय म्हणाले?
राहुल गांधी म्हणाले की, ‘भारतीय स्वातंत्र्यलढा हा दक्षिण आफ्रिकेतून सुरू झाला असून तो एनआरआय लोकांनी चालवला. कारण भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील मुख्य सूत्रधार महात्मा गांधी हे एनआरआय होते. त्यानंतर पंडित नेहरू, सरदार पटेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सुभाषचंद्र बोस हे सर्वजण एनआरआय होते. या सर्वांनी उघडपणाने जगातल्या आयडियाज स्वीकारल्या आणि त्यातून त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान केले.’
राहुल गांधींनी असा थेट दावा करून १८५७ सालच्या पहिल्या स्वातंत्र्यसंग्रामातील महान स्वातंत्र्य सेनानींना वगळूनच टाकले. भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे पितामह दादाभाई नवरोजी, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, गोपाळ कृष्ण गोखले, लाला लजपतराय, बिपिन चंद्र पाल यांच्यासारख्या दिग्गजांना राहुल गांधी विसरलेच. ‘भारताची स्वातंत्र्यलढा फक्त एनआरआय असलेल्या लोकांनीची चालवला. भारताच्या पुढच्या वाटचालीमध्ये एनआरआय योगदान देत आहे,’ असे राहुल गांधी म्हणाले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community