महात्मा गांधींच्या पणतीने लुबाडले ३ कोटी! ७ वर्षांचा कारावास!

लता रामगोबिन यांनी एसआर महाराज यांना भारतातून मागवलेल्या कपड्यांसाठी आयात आणि सीमाशुल्क भरण्यासाठी ३.२२ कोटी रुपयांची गरज आहे, असे सांगितले, त्यासाठी बनावट कागदपत्रांचे करारपत्र तयार केले आणि ही रक्कम मिळवली. 

142

महात्मा गांधी यांच्या पणती आशिष लता रामगोबिन यांनी तब्बल ३.२२ कोटी रुपये लुबाडल्या प्रकरणी त्यांना कारागृहात पाठवण्यात आले आहे. आफ्रिकेत राहणाऱ्या ५६ वर्षीय आशिष लता रामगोबिन यांना डरबनच्या एका न्यायालयाने आर्थिक फसवणुकीच्या आरोपावरून ७ वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आहे. विशेष म्हणजे न्यायालयाने त्यांना वरच्या न्यायालयात अपील करण्याची अनुमती दिली नसल्याने त्यांना कारागृहात जावे लागले.

या कंपनीचे लाटले पैसे! 

स्वत:ला व्यावसायिक असल्याचे सांगत आशिष लता रामगोबिन यांनी न्यू आफ्रिका अलायन्स फुटवेअर डिस्ट्रिब्युटर या कंपनीशी संबंध जोडले. ही कंपनी एसआर महाराज यांची ही कंपनी आहे. त्यांनी कंपनीला मोठ्या नफ्याचे आमिष ३.२२ कोटी रुपये लुबाडले. एसआर महाराजने लता यांना एक कन्साइमेंट इम्पोर्ट आणि कस्टम क्लिअर करण्यासाठी ३.२२ कोटी रुपये दिले होते. परंतु अशाप्रकारे कोणतेही कन्साइमेंट नव्हते. होणाऱ्या नफ्यातून काही वाटा एसआर महाराज यांना देऊ, असे आमिष लता यांनी दिले होते.

(हेही वाचा : पुणे अग्नितांडव : कंपनीच्या मालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल!)

काय करते न्यू आफ्रिकेतील अलायंस फुटविअर डिस्ट्रीब्यूटर्स?

लता रामगोबिन या प्रसिद्ध मानवाधिकार इला गांधी आणि दिवंगत मेवा रामगोबिन यांची मुलगी आहे. लता रामगोबिन यांची न्यू आफ्रिकेतील अलायंस फुटविअर डिस्ट्रीब्यूटर्सचे संचालक एसआर महाराज यांच्यासोबत ऑगस्ट २०१५ मध्ये भेट झाली होती. महाराज यांची कंपनी लिननचे कपडे आणि बूट आयात, उत्पादन आणि विक्री करते. त्याचसोबत त्यांची कंपनी इतर कंपन्यांना प्रोफिट शेअरच्या आधारे पैसे देते. लता रामगोबिन यांनी महाराज यांना सांगितले की, त्यांनी दक्षिण आफ्रिकी हॉस्पिटल ग्रुप नेटकेअरसाठी लिननच्या कपड्यांचे ३ कंटेनर भारतातून आयात केले आहेत, असे सांगितले. त्याकरता आयात आणि सीमा शुल्क भरण्यासाठी ३.२२ कोटी रुपये मागितले, त्यातील नफ्याचा वाटा महाराजांना देण्याचे आश्वासन दिले होते.

अशी केली फसवणूक!

लता यांनी एसआर महाराज यांना भारतातून मागवलेल्या कपड्यांसाठी आयात आणि सीमाशुल्क भरण्यासाठी पैसे कमी पडतायेत आणि बंदरावर सामान खाली करण्यासाठी पैशांची आवश्यकता आहे, असे सांगितले. या कामासाठी ३.२२ कोटी रुपयांची गरज आहे. स्वत:चे म्हणणे सिद्ध करण्यासाठी लता रामगोबिन यांनी खरेदी केलेला करार आणि ऑर्डर पावती दाखवली. परंतु महाराज यांना अखेर समजले की, लताने दाखवलेली सर्व कागदपत्रे बनावट आणि खोटी आहेत. त्याआधारे त्यांनी लता रामगोबिन यांच्याविरोधात खटला दाखल केला.

कोण आहेत इला गांधी?  

इंटरनॅशनल सेंटर फॉर नॉन वायलेंस या स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकारी संचालक असणाऱ्या रामगोबिनने स्वत:ला पर्यावरण, सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ता असल्याचे सांगितले. इला गांधी यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर मानवाधिकार कामासाठी अनेकदा सन्मानित करण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.