काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्यानंतर दिल्लीत सर्व विरोधी पक्ष एकत्र आले होते. त्याच धर्तीवर आता मुंबईत मशाल मोर्चा काढण्याची तयारी सुरू आहे. येत्या ११ एप्रिलला माहीम ते चैत्यभूमी परिसर असा मशाल मोर्चा काढण्याचे निश्चित करण्यात आले. यावेळी महाविकास आघाडीचे सर्व बडे नेते उपस्थित राहणार आहेत. या संदर्भातील अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येणार आहे.
( हेही वाचा : भाजपने हनुमानापासून प्रेरणा घ्यावी! भ्रष्टाचार आणि घराणेशाहीच्या राजकारणाविरोधात आपण जोरदार लढा देऊ – पंतप्रधान )
मुंबईत मशाल मोर्चा काढण्याची तयारी सुरू
भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने विरोधक एकत्र आल्यानंतर आता पुन्हा एकदा मुंबईत विरोधी पक्ष वज्रमूठ आवळणार आहेत. या पार्श्वभूमीवर बुधवारी झालेल्या बैठकीत सर्व विरोधकांचे एकमत झाले असून यात स्वयंसेवी संघटनाही काँग्रेसच्या मदतीला येणार असल्याचे समजते. या बैठकीला काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप, कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, भूषण पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या राखी जाधव, नरेंद्र राणे, तुषार गांधी यांच्यासह विविध संघटनांचे सदस्य उपस्थित होते. १२ राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, २५ सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होणार असल्याची माहिती आहे.
Join Our WhatsApp Community