मागील काही दिवसांपासून सत्ताधारी पक्षांकडून महापुरुषांबाबत होत असलेल्या आक्षेपार्ह वक्तव्य आणि राज्यातील इतर प्रश्नांवर महाविकास आघाडीतर्फे महामोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात मित्रपक्ष सहभागी होणार असून या मोर्चात विशाल गर्दी जमवण्यासाठी प्रत्येक नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना प्रत्येकी दोन बसेस भरुन कार्यकर्त्यांना घेऊन येण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार मुंबईतील प्रभागांमधून प्रत्येकी दोन बसेस भरुन कार्यकर्त्यांना भायखळा येथील रिचडसन क्रुडासपर्यंत आणण्याच्या सूचना तिन्ही प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी केल्याची माहिती मिळत आहे. त्यानुसार तिन्ही पक्षांच्यावतीने गर्दी जमवण्याची जमवा जमव करण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे प्रत्यक्षात या मोर्चातील गर्दीकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.
( हेही वाचा : कोरोनाकाळात मान्यता दिलेले ११० सॅनिटायझर निर्मिती प्रकल्प गुंडाळले )
सत्ताधाऱ्यांकडून महापुरूषांबाबत होत असलेली आक्षेपार्ह वक्तव्य आणि राज्यातील इतर प्रश्नांवर महाविकास आघाडीतर्फे महामोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात मित्रपक्ष देखील सहभागी होणार आहेत. परंतु, मोर्चादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी काही अटींच्या आधारे मोर्चाला लेखी परवानगी दिली आहे. महाविकास आघाडीकडून आयोजित हल्लाबोल महामोर्चासाठी शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांकडून तयारी करण्यात आली आहे. भायखळ्यातील रिचर्डसन्स अँड क्रूडास कंपनी ते टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीपर्यंत या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या संपूर्ण रस्त्यात तिन्ही पक्षांकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. भायखळा ते टाइम्स बिल्डिंगपर्यंत साडे तीन किलोमिटरचं हे अंतर आहे. गाडीतून प्रवास केल्यास हे अंतर कापायला १५ मिनिटांचा अवधी लागतो. लाखोंच्या संख्येने कार्यकर्ते मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. पोलिसांचाही चोख बंदोबस्त असेल. त्यामुळे पायी जाताना हे अंतर कापायला साधारण ३०-३५ मिनिटांचा कालावधी महाविकासआघाडीच्या नेत्यांना लागू शकतो,असा अंदाज आहे.
हा मोर्चा तीन प्रमुख पक्षांसोबत समाजवादी पक्ष आणि तर पक्षांच्यावतीने काढण्यात येत असल्याने यामध्ये मोठ्याप्रमाणात गर्दी जमवण्यासाठी तिन्ही प्रमुख पक्षांनी कंबर कसली आहे. यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस तसेच समाजवादी पक्षांचे ज्या भागांमध्ये नगरसेवक आहेत, त्या भागांमधून प्रत्येकी एक किंवा दोन बसेस भरुन आणण्याची जबाबदारी संबंधित नगरसेवकाची असेल तर, ज्या भागांमध्ये या तिन्ही पक्षांचे नगरसेवक नसतील त्या भागांमध्ये ज्या पक्षांचे प्राबल्य असेल तिथे त्या पक्षाच्या तालुका अध्यक्षांना दोन बसेस भरुन आणण्याच्या सूचना केल्या आहे. त्यामुळे मुंबईतील २२७ प्रभागांमधून प्रत्येकी एक ते दोन बसेस भरुन कार्यकर्ते या मोर्चाला आणण्याच्या प्रमुख सूचना असून याव्यतिरिक्त मग इतर शहरांमधून कार्यकर्तेही आणले जाणार आहे. त्यामुळे येथील प्रत्येक रस्त्यावर चक्काजाम होऊन मोर्चाची विशाल गर्दी दिसून यायला हवी म्हणून शिवसेनेने आपल्या प्रत्येक शाखेच्यावतीनेही एकेएक प्रत्येकी ५० ते १०० शिवसैनिक या मोर्चाला उपस्थित राहण्यात यावेत अशाप्रकारची सूचना केली आहे. विशेष म्हणजे शिवसेना आणि काँग्रेसने दक्षिण मुंबईतील भागांमधूनच अधिकाधिक कार्यकर्ते जमवण्यावर भर दिला आहे. त्यामुळे दक्षिण व दक्षिण मध्य मुंबईतील सेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर गर्दी जमवण्यावर अधिक भर असल्याची माहिती मिळत आहे.
या मोर्चासाठी गर्दी मोठ्याप्रमाणात जमवण्यासाठी महापालिका मुख्यालयातील शिवसेना पक्ष कार्यालयांमध्ये प्रथम आमदार, नगरसेवक व त्यानंतर इतर पदाधिकाऱ्यांच्याही बैठका घेऊन त्यांना मोर्चाच्या नियोजनाची कल्पना दिल्याची माहिती मिळत आहे.
Join Our WhatsApp Community