ठाकरे सरकारची अधिका-यांनी उडवली झोप! कॅबिनेटमध्येही गाजला मुद्दा

मागील वर्षभरात अधिकारी आणि मंत्र्यांमधील संवाद बघता आणि आता अधिकाऱ्यांकडून मंत्र्यांवर होणारे गंभीर आरोप बघता ठाकरे सरकारची या अधिकाऱ्यांनी झोप उडवली आहे.

144

माजी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांचा लेटरबॉम्ब त्यातच रश्मी शुक्ला यांचा समोर आलेला अहवल यामुळे ठाकरे सरकार अस्वस्थ झाले आहे. त्यामुळे अधिकारी वर्गाने ठाकरे सरकारची झोप उडवल्याचे पहायला मिळत आहे. विरोधकांपेक्षा आता ठाकरे सरकारची जास्त धास्ती वाटू लागल्याची भावना आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत काही मंत्र्यांनी बोलून दाखवल्याची माहिती मिळत आहे. जर मंत्र्यांचे फोन टॅप होत असतील आणि अधिकाऱ्यांकडून मंत्र्यांवरच थेट आरोप होत असतील तर काम तरी कसे करायचे, असे देखील काही मंत्र्यांनी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत बोलून दाखवले आहे. सरकार सुरळीत चालवायचे असेल तर अधिकारी आणि मंत्र्यांमध्ये चांगला संवाद असणे गरजेचे आहे. मात्र मागील वर्षभरात अधिकारी आणि मंत्र्यांमधील संवाद बघता आणि आता अधिकाऱ्यांकडून मंत्र्यांवर होणारे गंभीर आरोप बघता ठाकरे सरकारची या अधिकाऱ्यांनी झोप उडवली आहे.

तीन तासाहून अधिक चालली बैठक

आजची मंत्रिमंडळ बैठक ही तीन तासांहून अधिक वेळ चालली. यामधील सर्वात जास्त चर्चा ही फोन टॅपिंग आणि परमबीर सिंग यांच्यावरच झाली. यावेळी बैठकीत आपण मागील वर्षभरात अधिकाऱ्यांना ओळखण्यात कमी पडलो, अशी भावना देखील मंत्र्यांनी व्यक्त केली. सार्वजनिक बाधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी तर फोन टॅप होतात मग आपण काम कसे करणार, असे बोलून दाखवले. तसेच ही बाब गंभीर असल्याचे देखील ते बैठकीत म्हणल्याचे कळते.

(हेही वाचाः लवंगी की ‘अ‍ॅटम बॉम्ब’ लवकरच कळेल… फडणवीसांचं उत्तर की ‘धमकी’?)

मुख्यमंत्री म्हणाले आपण एकत्र लढू

एकूणच बैठकीतला मंत्र्यांचा सूर बघता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या सर्व प्रकरणात आपण एकत्र लढणे गरजेचे आहे, असे सांगितल्याचे कळते. तर त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची देखील बाजू ऐकून घेतली. अनिल देशमुख यांनी माझ्यावर झालेले आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे.

काय म्हणाले आव्हाड

फोन टॅप करायचा असेल तर गृहखात्याच्या अतिरिक्त सचिवांची परवानगी लागते. रश्मी शुक्लांनी अशी परवानगी घेतली नसल्याचे सीताराम कुंटेंनी सांगितले आहे. शुक्लांना फोन टॅपिंगची वाईट सवय होती, हे पूर्वीच्या सरकारच्या काळात देखील आरोप झाले आहेत. जेव्हा त्यांनी लिहिलेले पत्र उघड झाले, तेव्हा त्यांनी माफी मागितली. सरकारने दयाळू होऊन सौम्य भूमिका घेतली. तेच पत्र वापरुन महाराष्ट्र सरकारची बदनामी केली जात आहे, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.