वाझे प्रकरणी महाविकास आघाडी सरकारच्या जोर‘बैठका’!

मुंबईतील वर्षा बंगल्यावर गेले दोन दिवस मुख्यमंत्र्यांची महत्वाचे मंत्री आणि नेत्यांसोबतच्या ‘जोर’बैठका सुरू आहेत.

राज्यात सध्या चर्चेत असलेल्या पोलिस अधिकारी सचिन वाझे प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सह्याद्री अतिथीगृहावर महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांची सकाळी १० वाजता बैठक बोलावली आहे. बैठकीत पोलिस दलातील खांदेपालटाबाबत चर्चा होणार आहे. दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख, पोलिस महासंचालक हेमंत नगराळे, मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांचीही वाझे प्रकरणावर मंगळवारी रात्री १२ वाजेपर्यंत बंद दाराआड चर्चा झाली.

होणार मोठ्या घडामोडी

अंबानींच्या घराबाहेर सापडलेली स्फोटके आणि धमकी प्रकरणात मुंबई पोलिस दलातील अधिकारी सचिन वाझे यांना एनआयएने अटक केली आहे. या प्रकरणात अनेक गंभीर चुका केल्याचे, एनआयएच्या चौकशीतून पुढे येत आहे. त्यामुळे मुंबई पोलिस आयुक्तांवर याचे खापर फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील वर्षा बंगल्यावर गेले दोन दिवस मुख्यमंत्र्यांची महत्वाचे मंत्री आणि नेत्यांसोबतच्या ‘जोर’बैठका सुरू आहेत. शरद पवार यांनी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत मंगळवारी रात्री फोनवरुन चर्चा केली. त्यामुळे आज मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

(हेही वाचाः हिरेन यांनी शेवटचा प्रवास केला ती मर्सिडीज एनआयएच्या हाती… सापडल्या धक्कादायक वस्तू!)

बैठकीला हे उपस्थित असणार

उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री अनिल परब, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेस नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात बैठकीला उपस्थित असणार आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here