राज्यातील विधानसभा निवडणुका (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) जवळ येत असताना सर्वच पक्ष आता प्रचारासोबत जाहीरनामा (Mahavikas Aghadi Manifesto) प्रसिद्ध करत आहेत. रविवारी (१० नोव्हें.) महाविकास आघाडीकडून जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. मविआच्या या जाहीरनाम्याला ‘महाराष्ट्रनामा’ (Mahavikas Aghadi Manifesto) असे नाव देण्यात आले आहे. या जाहीरनाम्यात शेतकरी, महिला, तरुण आणि आरोग्य क्षेत्राच्यादृष्टीने घोषणा करण्यात आल्या आहेत. मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांनी या जाहीरनाम्याचे वाचन केले.
महाविकास आघाडी पहिल्या 100 दिवसांत काय करणार? (Mahavikas Aghadi Manifesto)
महालक्ष्मी योजनेंतर्गत महिलांना दरमहा 3 हजार रु.देणार
महिलांचा बस प्रवास मोफत करणार
सहा घरगुती गॅस सिलेंडर 500 रुपयांत देणार
महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीच्या दोन दिवस ऐच्छिक रजा देणार
जन्मास आलेल्या प्रत्येक मुलीस 18 वर्षे पूर्ण केल्यानंतर 1 लाख रुपये देणार
महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात काय काय? (Mahavikas Aghadi Manifesto)
- शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंत कर्जमाफी,नियमित कर्जफेड करणाऱ्यास 50 हजारांची सूट
- आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा आम्ही हटवणार
- जाती जणगणनना करणार
- 300 युनिट वीज वापरणाऱ्यांना 100 युनिट वीज मोफत
- दोन लाख सरकारी पदे भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करणार
- 2.5 लाख नोकरभरती करणार
- शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी उच्चस्तरीय समिती
- शेतमालाला हमीभाव देणार,पीकविम्याच्या जाचक अटी काढणार
- सुशिक्षीत बेरोजगारांना दरमहा 4 हजार मानधन
- अडीच लाख सरकारी नोकऱ्यांची भरती सुरु करणार
- बार्टी,महाज्योती,सारथीमार्फतची शिष्यवृत्ती वाढवणार
- एमपीएससी परीक्षांचे निकाल 45 दिवसांत लावणार
- महात्मा फुले आरोग्य योजनेची व्याप्ती वाढवणार
- महायुती सरकारचे पक्षपाती अध्यादेश रद्द करणार
- महायुती सरकारने खाजगी व्यक्तींना दिलेल्या भूखंडांवर फेरविचार करु
- शहरीकरणाला दिशा देण्यासाठी राज्य नागरी आयोग स्थापन करणार
- सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करणार
हेही पहा-
Join Our WhatsApp Community